NHI/MUMBAI
शेवटच्या साखळी सामन्यात मीरा-भाईंदर लायन्सने कल्याण टस्कर्सचा २० धावांनी पराभव करून माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांमधील आघाडीत ११ गुणांसह द्वितीय स्थान पटकाविले. एकूण साखळी आठ गुणांसह उत्तम सरासरीच्या बळावर कल्याण टस्कर्सने आघाडीत तृतीय स्थान मिळविल्यामुळे उपांत्य फेरीमध्ये पुन्हा एकदा मीरा-भाईंदर लायन्स विरुद्ध १४ मार्चला सकाळी ८.३० वा. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर भिडणार आहे. त्यानंतर दुसरा उपांत्य सामना ठाणे टायगर्स (१२ गुण) विरुध्द वाशी वॉरीयर्स (८ गुण) यामध्ये होईल.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर कल्याण टस्कर्स विरुद्ध मीरा-भाईंदर लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ऋग्वेद मोरे (१४ चेंडूत २२ धावा), अभिषेक श्रीवास्तव (२५ चेंडूत ३३ धावा), विराज चव्हाण (१९ चेंडूत २६ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे मीरा-भाईंदर लायन्सने मर्यादित २० षटकात ८ बाद १४३ धावा फटकाविल्या. अजय मिश्रा (२१ धावांत ३ बळी) व यश सिंग (३४ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. प्रत्युत्तर देताना सलामीवीर जपजीत रंधवा (२६ चेंडूत ३४ धावा) खेळपट्टीवर असेपर्यंत कल्याण टस्कर्सने विजयाकडे कूच केली होती….. Contd…
[6:36 pm, 13/03/2023] lilader chawan: परंतु अभिषेक श्रीवास्तवने (१८ धावांत ४ बळी) त्याची विकेट घेतल्यावर सामन्याला कलाटणी मिळाली. अष्टपैलू ऋग्वेद मोरेने (३ धावांत २ बळी) गोलंदाजीत अभिषेकला उत्तम साथ दिली. परिणामी कल्याण टस्कर्सचा डाव १८.१ षटकात १२३ धावसंख्येवर गडगडला. मीरा-भाईंदर लायन्सने २० धावांनी विजय मिळवीत एकूण साखळी ११ गुणांची नोंद केली. अष्टपैलू अभिषेक श्रीवास्तवला सामनावीर पुरस्काराने सेंट लॉरेन्स एज्युकेशनल अँड चॅरीटेबल ट्रस्टचे चेअरमन सिल्व्हेस्टर डिसोझा यांनी गौरविले. यावेळी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष आदी उपस्थित होते.
**********