नोकियानं लो-बजेट स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये आपला नवीन मोबाइल फोन Nokia C12 लाँच केला आहे. कंपनीच्या की सी- सीरीजमध्ये सादर करण्यात आलेला हा फोन काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये आला होता. भारतात हा फोन 6.3 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 2जीबी रॅम, 8एमपी रियर कॅमेरा आणि 3D पॅटर्न डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. पुढे तुम्हाला या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स मिळतील.
सनमीत सिंग कोचर, उपाध्यक्ष- भारत आणि मेना, एचएमडी ग्लोबल: “नोकिया C12 सादर करताना आम्हाला आनंद होत आहे, भारतातील आमच्या सी-सिरीज पोर्टफोलिओमध्ये आणखी एक उत्तम जोड आहे, जो किफायतशीर पॅकेजमध्ये टिकाऊपणा आणि कामगिरीचा समतोल प्रदान करतो. Nokia C12 मध्ये नोकिया स्मार्टफोनचे वचन दिले आहे- जाहिरातमुक्त अँड्रॉइड अनुभव, दीर्घकाळ बॅटरीचे आयुष्य, युरोपियन डिझाइन, दुप्पट सुरक्षित आणि सुरक्षित आणि अर्थातच, अतिरिक्त मनःशांतीसाठी एक वर्षाची बदली हमी. हे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि वर्च्युअल मेमरी एक्स्टेंशनसह वर्धित वापरकर्ता अनुभवासाठी येते. आमचा विश्वास आहे की आमचे ग्राहक सर्वात चांगल्यासाठी पात्र आहेत आणि गुणवत्ता, सुरक्षितता आणि नावीन्यपूर्णतेच्या आमच्या वचनबद्धतेद्वारे ते वितरित करण्यात आम्हाला अभिमान आहे.
Nokia C12 ची किंमत आणि उपलब्धता
नोकिया सी12 स्मार्टफोन कंपनीनं 2 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेजसह सादर केला आहे. याची किंमत 5,999 रुपये आहे. डिवाइस 17 मार्चपासून अॅमेझॉन इंडियावर सेलसाठी उपलब्ध होईल, जिथे ग्राहक हा फोन Dark Cyan, Charcoal आणि Light Mint अशा तीन कलरमध्ये विकत घेऊ शकतील.
Nokia C12 चे स्पेसिफिकेशन्स
- 6.3-इंच एचडी+ डिस्प्ले
- 2जीबी रॅम (2GB व्हर्च्युअल रॅम) + 64जीबी स्टोरेज
- यूनिसॉक 9863A1 प्रोसेसर
- 8एमपी रियर + 5एमपी सेल्फी कॅमेरा
- 3,000एमएएचची बॅटरी
नोकियाच्या या फोनमध्ये 20:9 ऑस्पेक्ट रेश्यो आणि 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.3 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉचसह येतो. त्याचबरोबर यात 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर यूनिसॉक 9863A1 प्रोसेसर देण्यात आला आहे. 2GB रॅम व 2GB व्हर्च्युअल रॅम व्यतिरिक्त डिवाइसमध्ये स्टोरेजसाठी डिवाइसमध्ये 64जीबी मेमरी मिळते. विशेष म्हणजे फोनची ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 256जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या नोकिया फोनमध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही एक रिमूव्हेबल बॅटरी आहे त्यामुळे तुम्ही बॅक पॅनल उघडून हिला बदलू शकता.
Nokia C12 अँड्रॉइड गो एडिशनवर चालतो. या फोनमध्ये गुगल गो अॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात, जे कमी रॅम आणि स्टोरेज वापरतात. अन्य फीचर्स पाहता Nokia C12 मध्ये IP52 रेटिंग मिळते. तसेच, फोनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय आणि 3.5 mm जॅक सारखे फीचर्स पण देण्यात आले आहेत. फोनचं वजन 177.4 ग्राम आहे.