पिंपरी-चिंचवड शहरात एका महिलेची हत्या झाली आहे. तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याची माहिती आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर हा पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तरी या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे पाहयला मिळत आहे. दररोज गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हिंजवडी फेज २ परिसरात पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हिंजवडी येथे एका आयटी कंपनी समोरील फुटपाथवर महिलेचा खून झाला असल्याचं समोर आलं आहे. स्वाती राठोड असे या महिलेचे नाव असल्याची माहिती आहे. महिलेच्या पतीनेच चाकूने भोकसून तिचा खून केल्याचे समोर येत आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. स्वाती राठोड नावाच्या महिलेच्या पतीने चाकू भोकसून तिचा खून केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशनदरम्यान वरील फुटपाथवर हा खून झाल्याची माहिती आहे.
एवढंच नाही तर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा खून झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. खून केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचे काम हिंजवडी पोलिसांकडून सुरू आहे.