ग्रासरूट्स उपक्रमाने जवळपास ५० देशांमधील ९०० प्रशिक्षकांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ६४० प्रकल्पांची सुविधा दिली आहे; २००,००० खेळाडू व २५,००० हून अधिक प्रशिक्षकांना लालिगा मेथोडोलॉजीमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे
मुंबई, मार्च ११, २०२३ – लालिगाने लालिगा ग्रासरूट्स उपक्रमासह मैलाचा दगड गाठत २०२३ ची सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत लालिगा जगभरात तळागाळातील फूटबॉलला चालना देण्यासाठी माहिती, अनुभव व प्रकल्पांना एकत्र आणते. या उपक्रमाने भारतासह ४८ देशांमध्ये ६४० हून अधिक कायमस्वरूपी व तात्पुरते प्रकल्प विकसित केले आहेत. यूईएफए प्रो परवानाकृत प्रमाणपत्रे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनुभव आणि लालिगाच्या अनुषंगाने मूल्यांवर आधारित लालिगाने निवडलेल्या ९०० हून अधिक युवा फूटबॉल प्रशिक्षकांद्वारे उपक्रमांचे व्यवस्थापन केले जाते.
विविध वयोगटातील व स्तरावरील २००,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या विकासासोबत लालिगाने आपल्या कार्यसंचालनांमध्ये २२,००० स्थानिक प्रशिक्षकांना देखील प्रशिक्षित केले आहे.
भारतात ‘इंडिया ऑन ट्रॅक’सोबत सहयोगाने २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या लालिगा फूटबॉल स्कूल्स (एलएलएफएस) प्रकल्पाने १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकला आहे. हा उपक्रम स्पेनमधील यूईएफए प्रो-परवानाधारक प्रशिक्षकांद्वारे विकसित व प्रशासित आहे आणि स्थानिक टॅलेंटला जागतिक फुटबॉल पद्धती, तसेच ९ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल प्रशिक्षण प्रदान करत आहे. तसेच, हा उपक्रम आंतरराष्ट्रीय माहितीच्या देवाणघेवाणीद्वारे फूटबॉल प्रशिक्षक व प्रशासकांचा विकास करतो. यामुळे रणनीतिक-संज्ञानात्मक, टेक्निकल-समन्वयात्मक, शारीरिक-सशर्त आणि मानसिक-सामाजिक-प्रभावी या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश असलेल्या लालिगा पद्धतीनुसार खेळाडूंच्या सर्वांगीण विकासात मदत होते.
नुकतेच नवीन एलएलएफएस ‘डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची घोषणा करत एलएलएफएस भारतातील आपल्या कार्यसंचालनाची व्याप्ती वाढवत राहिल, ज्याअंतर्गत सर्वोत्तम अंडर १३ व अंडर १५ खेळाडूंना एमडीएफए सेकंड डिव्हिजन लीग आणि इतर अधिकृत स्पर्धांमध्ये प्रगत प्रशिक्षण व स्पर्धात्मक गेम टाइम देण्यात येईल. ‘गोलकिपर स्कूल’ची उभारणी, ‘वेस्ट इंडिया कप’चा शुभारंभ आणि भारतातील पहिले ‘डेव्हलपमेंट सेंटर’ उभारण्याकरिता रोडमॅपसह दृष्टिकोन भारतीय टॅलेंटच्या विकासासाठी साह्यभूत ठरत आहे.
माहितीची देवाणघेवाण करण्याची सुविधा देणाऱ्या आराखड्यांच्या माध्यमातून लालिगाने स्थानिक भारतीय क्लब्स व केंद्रांना डेपोर्टिवो अॅलावेस, कॅडिज सीएफ, सेविला एफसी व विलारिअल एफसी यांच्यासोबत सहयोग करण्याची सुविधा दिली आहे. ज्यामुळे स्थानिक तळागाळातील सहाय्यकांना प्रशिक्षण पद्धत व दर्जात्मक पद्धती शेअर करता येतात.
लालिगाची भारतीय फूटबॉल विकासाप्रती कटिबद्धतेबाबत बोलताना लालिगा फूटबॉल स्कूल्स इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर मिगुएल कॅसल म्हणाले, ‘‘युवा टॅलेंट विकसित करण्यासाठी तळागाळातील फूटबॉलच्या सामर्थ्यावर लालिगाचा विश्वास एलएलएफएस इंडिया प्रकल्पामध्ये खोलवर रुजलेला आहे. भारतीय फूटबॉलसाठी आमची बांधिलकी अतूट आहे आणि जागतिक स्तरावर एक प्रबळ खेळाडू म्हणून या देशाची क्षमता जागृत करण्यास आमची भूमिका बजावल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आमचे भागीदार, इंडिया ऑन ट्रॅकसोबत सहयोगाने काम करणे सुरू ठेवल्यामुळे आम्हाला आमच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे आणि आम्हाला आमच्या प्रकल्पात दिसत असलेली प्रबळ वाढ पाहून आनंद झाला आहे.’’
लालिगा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जोस अॅन्टोनिओ म्हणाले, ‘‘लालिगा ग्रासरूट्स उपक्रमाने जागतिक व्यासपीठावर केलेली वाढ आणि परिणाम अभूतपूर्व आहेत. जागतिक फूटबॉलच्या अव्वल लीगमधील युरोपीय प्रदेशातील आमची कामगिरी आणि रँकिंगमधून लालिगाने विकसित केलेली सर्वोत्तम कार्यपद्धती दिसून येते. भारतात एलएलएफएस प्रकल्पाद्वारे हीच पद्धत लागू आहे, जेथे आम्ही देशात सुरेख खेळ विकसित करत आहोत. यावर्षी भारतात एलएलएफएस प्रकल्पाला ५ वर्षे पूर्ण होत आहेत, आम्ही देशभरातील टॅलेंटला त्यांची फूटबॉल क्षमता साध्य करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करत आहोत.’’
युरोपमध्ये, युरोपियन फुटबॉल डेटा एकत्र आणणारी आघाडीची संस्था सीआयईएस फूटबॉल ऑब्झर्व्हेटरी सारख्या प्रतिष्ठित संस्थांनी एकत्रित केलेल्या युरोपमधील सर्वोत्तम युवा अकॅडमींच्या क्रमवारीत लालिगा संघांचे वर्चस्व आहे. अॅथलेटिक क्लब, एफसी बार्सिलोना, आरसी सेल्टा, आरसीडी इस्पॅन्यॉल डी बार्सिलोना, सीए ओसासुना, रिअल सोसिएदाद आणि व्हॅलेन्सिया सीएफ हे सर्व पाच मोठ्या युरोपियन लीगमधील टॉप १५ संघांमध्ये आहेत, ज्यांनी २०२१/२२ सीझनमध्ये स्वदेशी खेळाडूंना खेळण्यासाठी सर्वाधिक वेळ दिला. तसेच अॅथलेटिक क्लब, रिअल सोसिएदाद आणि आरसी सेल्टा यांनी स्पॅनिश पोडियम तयार केला होता. अॅटलेटिको डी माद्रिद, एफसी बार्सिलोना, रिअल माद्रिद आणि व्हॅलेन्सिया सीएफ हे पाच प्रमुख युरोपियन लीगमधील या हंगामातील टॉप १५ सर्वात उत्पादनक्षम युवा अकॅडमींमध्ये देखील आहेत.
पाच मोठ्या युरोपियन लीगमध्ये लालिगा काही फरकाने क्रमवारीत आघाडीवर आहे: चालू हंगामाच्या पहिल्या सहामाहीत, युवा खेळाडू स्पर्धेतील १५.८ टक्के मिनिटे खेळले होते, तुलनेत लीग १ मध्ये १२.४ टक्के, प्रीमियर लीगमध्ये ११.८ टक्के आणि काहीसे मागे, बुंडेस्लिगामध्ये ७.१ टक्के व सिरी ए मध्ये ५.५ टक्के मिनिटे खेळले होते, ज्यामधून लालिगा युरोपमधील तळागाळातील फूटबॉलमध्ये अग्रस्थानी असल्याचे दिसून येते.