बँक ऑफ बडोदा’तर्फे नाटकीपणा-मुक्त गृह आणि वाहन कर्ज मंजुरी फक्त 30 मिनिटांत
महिला आयपीएल उदघाटनानिमित्त अभियानची शुरवात, सहकारी मीडिया प्रायोजकाच्या भूमिकेत बँक
मुंबई, 11 मार्च, 2023: भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक ऑफ बडोदा च्या वतीने #लोन्स विदाऊट ड्रामा (#LoansWithoutDrama) जाहिरात अभियान सुरू करण्याची घोषणा केली. दोन लोकप्रिय चित्रपट-आधारित पात्र विनोदी ढंगाने एकमेकांशी सहज संवाद साधत डिजीटल पद्धतीने अर्ज करून केवळ 30 मिनिटांत बँक ऑफ बडोदा’ कडून (home loan) गृह कर्ज किंवा (car loan) वाहन कर्जासाठी मंजुरी मिळविणे* शक्य असल्याची माहिती देतात.
#लोन्स विदाऊट ड्रामा घर आणि कार कर्जाचे अभियान हयाची वेगळी बाजू मांडनार, सामान्यत: खरेदीदार अलीकडे केलेल्या खरेदीबद्दल आपल्या कुटुंब आणि मित्रांशी थोडे नाटकीपणाने बोलतात. त्यांच्या बोलण्यात किंचित अतिशयोक्ती असते आणि ते रंजक कथा सांगतात. बँक ऑफ बडोदाकडून डिजीटल कर्जाची मंजुरी मिळविणे किती सोपे आहे हे स्पष्ट झाल्यावर ही जाहिरात एका ट्विस्टने संपते – फक्त 30 मिनिटांत आणि कोणत्याही नाटकवजा कटकटीशिवाय बँक ऑफ बडोदा’ सारख्या विश्वासू भागीदारासह आजच्या ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षा देखील जाहिरातीतून व्यक्त होतात.
वाढत्या आकांक्षा लक्षात घेता, डोळे विस्फारण्यास भाग पाडणाऱ्या #लोन्स विदाऊट ड्रामा गृह आणि वाहन कर्ज टीव्हीसी’चे लॉन्च हे वुमेन्ज प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) च्या उदघाटण्यात आवृत्ती दरम्यान करण्यात आले. बँक ऑफ बडोदा हा डब्ल्यूपीएल’चा सहकारी मीडिया प्रायोजक आहे. बँक आपल्या तत्त्वज्ञानासोबत डब्ल्यूपीएल’ला पाठबळ देत, उदयोन्मुख भारतीय क्रीडापटू, प्रामुख्याने महिलांचे समर्थन करते. तसेच दीर्घकालीन टिकाऊ भागीदारी निर्मितीवर देखील भर आहे. योगायोग म्हणजे बँकेची ब्रँड एंडॉर्सर, शेफाली वर्मा ही युवा, आश्वासक प्रतिभा असून डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या आवृत्तीत खेळणाऱ्या स्टार क्रिकेटर्सपैकी एक आहे.
बँक ऑफ बडोदा’चे डेप्युटी जनरल मॅनेजर, हेड – मार्केटिंग आणि ब्रँडिंग, व्ही जी सेंथिलकुमार म्हणाले, “कर्जासाठी अर्ज करणे ही एक कठीण प्रक्रिया असते असे सामान्यपणे मानले जाते. ज्यामध्ये कर्ज मिळविण्यासाठी एखाद्याला दीर्घ आणि त्रासदायक प्रक्रियेतून जावे लागते. आम्हाला ती मिथकं मोडून काढायची गरज होती आणि बँक ऑफ बडोदा कार आणि होम लोन प्रक्रियेचा साधेपणा अधोरेखित करायचा होता. मनोरंजक आणि लक्षवेधी स्वरूपात दर्शकांची पसंती मिळवायची होती. आजच्या तारखेत ग्राहक हे त्यांना केवळ त्यांची स्वप्ने आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सक्षम बनविणाऱ्या आर्थिक भागीदाराच्या शोधात नसून त्यांना जलद, अखंड आणि त्रासमुक्त रीतीने स्वप्न पूर्ण करण्याऱ्या सक्षम पर्यायाच्या शोधात आहेत. त्यासाठीच बँक ऑफ बडोदा’चे #लोन्स विदाऊट ड्रामा हे ग्राहकांच्या आर्थिक गरजांचे उत्तर ठरते.
हे बहुभाषिक आणि बहु-आयामी अभियान/कॅम्पेन, #लोन्स विदाऊट ड्रामा टेलिव्हिजन, रेडिओ, डिजीटल आणि आऊटडोअर मंचांवर आठ भाषांमध्ये सुरू राहील – हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड.
बँक ऑफ बडोदा’ने अलीकडेच गृह कर्जाचा व्याज दर 40 बेसिस पॉइंट (बीपीएस) ने कमी करत 8.50%* प्रति वर्ष केला. हा खास दर 31 मार्च 2023 पर्यंत मर्यादित कालावधीकरिता वैध आहे. हा उद्योग क्षेत्रातील सर्वात कमी आणि सर्वाधिक स्पर्धात्मक व्याज दर आहे. त्याशिवाय व्याज दर कमी करत बँकेच्या वतीने गृह कर्जांवरील प्रक्रिया शुल्कात 100% माफी देण्यात येते आहे.
बँक ऑफ बडोदा गृह कर्ज मिळविण्यासाठी अर्जदारांनी खालील चरण पाळावेत:
1. बीओबी वर्ल्डला लॉग इन करा आणि भेट द्या https://www.bankofbaroda.in/
2. दस्तावेज अपलोड करा
3. 30 मिनिटांत* मंजुरी मिळवा
4. आकर्षक व्याज दर मिळवा
बँक ऑफ बडोदा कार लोन्स वैशिष्ट्ये:
1. पूर्णपणे डिजीटल प्रक्रिया
2. रू. 20 लाख*पर्यंत पूर्व-संमत ऑफर्स
3. प्रक्रिया किंवा पूर्व-भरणा शुल्क नाही
4. आकर्षक व्याज दर मिळवा
*नियम आणि अटी लागू