MUMBAI/NHI
माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये कल्याण टस्कर्स व बेलापूर ब्लास्टर्सने सहाव्या साखळी सामन्यामध्ये चौथ्या विजयाची नोंद करून बाद फेरी प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सलामीवीर जपजीत रंधवाच्या (७९ धावा) दमदार फलंदाजीमुळे कल्याण टस्कर्सने अपराजित ठाणे टायगर्सवर ४८ धावांनी मात केली तर शंतनू नायक (नाबाद ३४ धावा) व अनिकेत खडपे (३२ धावा) यांच्या प्रमुख फलंदाजीमुळे बेलापूर ब्लास्टर्सने अंबरनाथ अवेन्जर्सचा ५ विकेटने पराभव केला. एनएमपीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर अभिजित घोष यांच्या हस्ते बेलापूरच्या शंतनू नायकला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर ठाणे टायगर्सने नाणेफेक जिंकून कल्याण टस्कर्सला प्रथम फलंदाजीचा दिलेला निर्णय अनुकूल ठरला नाही. सामनावीर जपजीत रंधवा (४८ चेंडूत ७९ धावा) व अरमान शेख (१९ चेंडूत ३६ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे कल्याण टस्कर्सने १९.४ षटकात सर्वबाद १५१ धावा फटकाविल्या. सुमित मारकलीने २९ धावांत ३ बळी घेतले.
[6:58 pm, 10/03/2023] lilader chawan: यश सिंग (१४ धावांत ३ बळी) व आदित्य धुमाळ (१८ धावांत २ बळी) यांची अचूक गोलंदाजी आणि कल्याणच्या (२ धावबाद) दक्ष क्षेत्ररक्षणामुळे ठाणे टायगर्सचा डाव २० षटकात ८ बाद १०३ धावसंख्येवर समाप्त झाला. परिणामी कल्याण टस्कर्सने बलाढ्य ठाण्यावर ४८ धावांनी शानदार विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात पराग जाधवने (४० चेंडूत नाबाद ३९ धावा) प्रमुख फलंदाजी केल्यामुळे अंबरनाथ अवेन्जर्सने २० षटकात ८ बाद ११२ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तर देतांना बेलापूर ब्लास्टर्सची सलामी जोडी प्रसाद शिंगोटेच्या (१० धावांत २ बळी) गोलंदाजीवर पहिल्या व चौथ्या चेंडूवर पव्हेलीयनमध्ये परतली. २ बाद १ धाव अशा नाजूक स्थिती नंतर शंतनू नायक (४३ चेंडूत नाबाद ३४ धावा), अनिकेत खडपे (३७ चेंडूत ३२ धावा), आकाश पारकर (११ चेंडूत नाबाद २५ धावा) यांनी बेलापुरला १९व्या षटका अखेर ५ बाद ११५ अशी विजयी धावसंख्या रचून दिली.