-
महिला आणि पीडब्लुडी ( विशेष अपंग ) यांच्या कार्यबलामध्ये 100% विविधता आणण्यात यशस्वी
-
इक्विटी आत्मसात करण्याच्या जागतिक आयडब्लुडी थीमच्या अनुषंगाने भारतातील त्यांच्या 27 उत्पादन युनिटपैकी 15 मध्ये शॉप फ्लोअरवर 50% पेक्षा जास्त विविधता प्राप्त करून आयडीई (अजेंडाला गती
नवी दिल्ली, 9 मार्च 2023 – वाइन आणि स्पिरीट इंडस्ट्रीतील जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या पेर्नॉड रिकार्ड इंडिया (पीआरआय) ने 40% पेक्षा जास्त महिलांचे नेतृत्व असलेली स्त्री –पुरुष समान संस्था बनून यशाचा परमोच्च शिखर सर केले आहे . 2030 साठी संस्थेच्या विविधतेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेला गती देत, कंपनीने गेल्या दोन वर्षांत स्त्रियांच्या भरती प्रक्रियेत वाढ केली आहे, अनेक हस्तक्षेप आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. परिणामी, पेर्नोड रिकार्ड इंडियाने गेल्या एका वर्षात विविधतेच्या मापदंडात लक्षणीय वाढ केली आहे आणि सर्व नवीन कर्मचाऱ्यांपैकी 50% हे विविधतेचे उमेदवार आहेत. प्रत्येक स्तरावर भक्कम, वैविध्यपूर्ण आवाज आणि दृष्टीकोनांचे प्रतिनिधित्व करत, कंपनीने भारतातील त्यांच्या 27 उत्पादन युनिटपैकी 15 पेक्षा जास्त शॉप फ्लोअरवर महिलांचे 50% प्रतिनिधित्व आणि वैविध्यपूर्ण कर्मचारी वर्ग देखील नियुक्त करून यशाचा परमोच्च शिखर सर केला आहे. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (UNSDGs) आणि कंपनीच्या 2030 रोडमॅपशी सुसंगत, हे आयडीई यश कार्यस्थळी सर्व लिंग, क्षमता आणि इतर परस्परसंबंधांचा समावेश करण्याच्या दीर्घकालीन बांधिलकीची परिणती आहे.
या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बोलतांना, नितू भूषण, सीएचआरओ, पेर्नोड रिकार्ड इंडिया म्हणाल्या, “ आम्ही 2020 मध्ये आमचा समावेश, विविधता आणि इक्विटी (IDE) प्रवासाची सुरुवात एका मजबूत महत्त्वाकांक्षेने केली होती आणि त्या मागे हा उद्देश होता की अधिक संस्थांनी ठरविलेले उद्योग बेंचमार्क उद्देशाचे अनुसरण करावे. आमचा असा विश्वास आहे की आमच्या कर्मचार्यांमध्ये सर्वसमावेशक संस्कृती, वैविध्यपूर्ण विचार आणि समानतेचा प्रचार केल्याने अंतर्दृष्टी शोधून काढता येऊ शकते जी संभाव्यपणे घातांकीय व्यवसाय वाढीस चालना देऊ शकते. असंख्य उच्च–प्रभाव धोरणे, संवेदीकरण आणि मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे वैविध्यपूर्ण कार्यस्थळाची स्थापना करून कर्मचार्यांना सुरक्षित वाटेल, त्यांची व्यावसायिक वाढ होईल आणि ते आनंदी वातावरणात काम करतील अशा वातावरणाचे निर्माण करायचे आहे. एक मजबूत सुरुवात केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे आणि आम्ही लिंगभेदा पलीकडे जावून लोकांसाठी सर्वसमावेशक आणि आनंददायी कार्यस्थळ विकसित आणि विस्तीर्ण करून आमच्या दृष्टीकोनाला पुढे चालू ठेवू.”
पर्नॉड रिकार्ड भारताच्या धोरणात्मक चौकटीत विविधता, समावेश आणि समानता हे केंद्रस्थान आहे. या वचनबद्धतेचे उत्कृष्ट उदाहरण मांडत , पेर्नोड रिकार्ड इंडिया फाउंडेशन, कंपनीची सीएसआर शाखा, आज महिला आणि अपंग व्यक्ती (PWD) 100% वैविध्यपूर्ण कार्यशक्तीचे नेतृत्व करत आहे. या वर्षी कंपनीने भारतातील 27 पैकी 8 उत्पादन युनिट्समध्ये शॉपफ्लोरमध्ये 70% विविधता प्राप्त केली आहे.
लिंग समान कार्यबलावर बोलताना, झैनाब पटेल, चीफ– IDE, पेर्नोड रिकार्ड इंडियाम्हणाल्या, “स्त्री पुरुष समानता कंपनीच्या नफा, मूल्य निर्मिती आणि प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याशी सकारात्मक संबंध आहे. ज्या कंपन्यांच्या बोर्डावर अधिक महिला आहेत अशा कंपन्या इक्विटी, विक्रीवर परतावा, भांडवलावरील परतावा, शेअर्सची कामगिरी आणि शेअरच्या किमतीत वाढ यांमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकतात – ही पेर्नोड रिकार्ड इंडियामधील आयडीईची गाथा आहे .
आपला आयडीई अजेंडा पुढे नेण्यासाठी, पेर्नोड रिकार्ड इंडियाने संपूर्ण इकोसिस्टममध्ये सर्वसमावेशकता आणि समानता चालविण्यासाठी इमर्सिव प्रशिक्षण सत्रे, संवेदनशीलता आणि मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केले आहेत. लिंग-तटस्थ शौचालये, अपंगत्व सुलभता जागा, कर्मचार्यांसाठी निरोगीपणा आणि श्रद्धा कक्ष यासारखे उपक्रम कंपनीच्या मोठ्या समावेशन, विविधता आणि समानता उद्दिष्टाचा भाग आहेत. समलैंगिक (LGBTQI+) कर्मचार्यांसाठी सशक्त कामाचे वातावरण तयार करण्यासाठी, निवारण गट , प्राइड सर्कलसह सहयोगी कार्यक्रम, समुदाय सदस्यांसाठी कर्मचारी संसाधन गट आणि अभिमानाचा प्रवास शेअर करण्यासाठी मायक्रो-लर्निंग कॅप्सूल यासारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. याशिवाय, कंपनीने आयडीई परिषदेची स्थापना केली आहे ज्याचे अध्यक्ष कंपनीचे एमडी स्वतः आहेत आणि करिअर आफ्टर ब्रेक, कौशल्य वर्धन, युनिक मेंटॉरशिप प्रोग्राम्स आणि महिला आणि अपंग लोकांसाठी इतर समावेशक कार्यक्रम यासारख्या पैलूंवर लक्ष केंद्रित केले आहे.
या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी, या परिषदेने त्यांच्या करिअरमधून ब्रेक घेतलेल्या आणि कामावर परत येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी ‘बॅक टू स्पिरिट’ उपक्रम सुरू केला आहे. पुढील टप्प्यात, हा कार्यक्रम सर्व लिंग आणि अभिमुखतेच्या सदस्यांसाठी विस्तारित केला जाईल. समलैंगिक समुदायाविरुद्ध विद्यमान अवचेतन पूर्वाग्रह लक्षात घेऊन, कंपनीने कर्मचार्यांना भाषा आणि नाटकावर आधारित प्रशिक्षण देणार्या मॉड्यूलवर काम केले आहे जे संपूर्ण पर्यावरणातील संवेदीकरण कर्मचार्यांना शिकवते. दिव्यांग कर्मचार्यांसाठी कामाची जागा अधिक समावेशक बनवण्यासाठी, कंपनीने स्ट्रक्चर्ड ऑडिट केले आहेत जे समुदाय सदस्यांसाठी विशेष कौशल्याचे दरवाजे उघडून त्यांना भूमिका ओळखण्यात मदत करतात आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून रोजगाराच्या संधि उपलब्ध करून देतात.
पेर्नोड रिकार्ड इंडियाहे प्रदीर्घ काळापासून भेदभावाला आव्हान देत आहे आणि पारंपारिकपणे पुरुषप्रधान अल्कोबेव्ह उद्योगात स्वतःची कथा रचत आहे . कंपनी एक निष्पक्ष, संतुलित आणि आनंददायी कार्यस्थळ स्थापन करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवून विविधतेचे वर्णन पुढे चालू ठेवेल.