मुंबई : प्रतिनिधी/ NHI
एका आनंददायी आणि सशक्त अनुभवासाठी आमच्या बरोबर सामील व्हा; कारण ‘जी बेफिकर’- ही महिलांची बाइक रॅली आयोजित करून कोरम मॉल महिला विशेष महिना साजरा करत आहे. तुम्ही एखाद्या अनुभवी बाईकर असाल वा फक्त उत्साही असाल ही १० किमीची रॅली सर्व महिलांसाठी खुली आहे.
तुमच्याच सारखी बाइक चालवण्याची आवड असलेल्या अन्य महिलांना भेटण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी या विशेष कार्यक्रमात उपस्थित रहा आणि बाइक चालिका जेव्हा हा रोमांचकारी बाइक प्रवास सुरू करतील तेव्हा स्त्रीत्वाला तुमचा पाठिंबा दाखवा.
या अतुलनीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी http://bit.ly/AWBR2023 या संकेतस्थळावर नोंदणी करा
शिवाय कोरम मॉलमध्ये नवीनतम आणि आधुनिक गाण्यांच्या तालावर आणि विविध शैलीतील लोकप्रिय गायक आणि बॅंड्सच्या प्रसिद्ध गाण्यांवर झुंबाची कार्यशाळा आणि तुमच्या आवडत्या डिझाईन साठी टॅटू काऊंटर देखील असेल.
महिला सक्षमीकरण, स्वातंत्र्य आणि सामर्थ्य साजरे करण्याची ही विशेष संधी चुकवू नका.
तारीख आणि दिवस: १२ मार्च, २०२३, रविवार
प्रारंभ ठिकाण: टिपटॉप प्लाझा, ठाणे
रिपोर्टिंग वेळ: सकाळी ६.३०
प्रारंभ वेळ: सकाळी ०८:३०
शेवटचे ठिकाण: कोरम मॉल, ठाणे
नोंदणी शुल्क: शून्य (अल्पोपहार समाविष्ट)