नवी मुंबई : NHI
नवी मुंबईत सानपाडा येथील श्री. दत्त विद्यामंदिर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ आयोजित वार्षिक स्नेहसंम्मेलन मेळावा २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शाळेच्या मैदानावर ” संस्कृती महाराष्ट्राची ” या कार्यक्रमाने संपन्न झाला. या वार्षिक स्नेहसंम्मेलन मेळाव्यात पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने गाणी व नृत्य सादर केली. सदर मेळाव्यास सानपाडा येथील नगरसेविका सौ. कोमल वास्कर आणि नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक यांना शिवमंदिरात अन्नदान केले. या वार्षिक स्नेहसंमेलनास जवळजवळ एक हजार विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. सदर स्नेह संमेलनास शिवसेनेचे नवी मुंबईतील उपजिल्हाप्रमुख प्रमुख श्री. मिलिंद सूर्याराव, शाखाप्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सिताराम मास्तर उद्यानातील ७.५० ग्रुपचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.