मुंबई, 02 मार्च 2023: भारतातील आघाडीची आशय (कंटेंट) वितरण करणारी कंपनी ‘डिश टी.व्ही इंडिया लिमिटेड’ च्या वेगाने वाढणाऱ्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या वॉचोने आज एक्सप्लोसिव्ह या मूळ क्राइम थ्रिलर मालिकेच्या प्रीमियरची घोषणा केली. मालिकेचे मनोरंजक कथानक आणि आकर्षक पात्रे यामुळे गूढता, रहस्य, नाटक आणि उत्साह यांचे एक आदर्श मिश्रण बनते जे क्राइम थ्रिलर लेखनशैलीच्या (जॉनरच्या) चाहत्यांना आकर्षित करेल.
मुंबईच्या गल्ल्यांवर आधारित ‘एक्सप्लोसिव्ह’ ह्या पात्रावर (कॅरेक्टरवर) आधारित क्राइम थ्रिलर आहे, ज्याची परिणती (समाप्ती) एका अनपेक्षित पण सुसंबध्द समाधान मिळण्यात होते. ही कथा किरण नावाच्या मुली भोवती फिरते जी एका स्फोटकांनी भरलेल्या गाडीत चुकून प्रवेश करते आणि ती गाडी नीरव नावाचा दहशतवादी चालवित असतो. किरण व पोलिस शहरात साखळी बॉम्बस्फोट रोखण्याचा प्रयत्न करत असण्यावर ही मालिका आहे. यात दोन दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश येते पण तरी तिसऱ्याचे भवितव्य अद्याप माहीत नसते. या मुलीला शहर आणि लाखो लोकांचे प्राण वाचविता येतील का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वॉचो एक्सक्लुझिव्ह पाहता येईल.
तनिष्क राज आणि जागृती राजपूत यांच्या नेतृत्वाखालील रुद्राक्षनमम् फिल्म्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. शौर्य सिंग यांनी काटेकोरपणे लिहिलेल्या या कथेचे दिग्दर्शन केले आहे, तर अवनींद्र कुशवाह यांचे हृदयद्रावक पार्श्वसंगीत कथानकाला पूरक आहे. किरण, नीरव आणि इन्स्पेक्टर तेजसच्या भूमिकेत अनुक्रमे निबेदिता पॉल, मनमोहन तिवारी आणि सचिन वर्मा यांनी दमदार अभिनय रंगविला आहे.
ह्या सादरीकरणावर भाष्य करताना वॉचो डिशटीव्ही इंडिया लिमिटेडचे कॉर्पोरेट हेड-मार्केटिंग, श्री. सुखप्रीत सिंग म्हणाले की,
“एक्सप्लोसिव्ह” ही आश्चर्यकारक पात्रे आणि अनपेक्षित कथानक असलेली कथा आहे जी प्रेक्षकांना स्क्रीनला खिळवून ठेवते. लेखकाने कथेला उलगडणे आणि वळण (ट्विस्ट) देऊन कुशलतेने विणले आहे आणि यामुळे टेन्शन जास्त राहते. ही कथानक मालिकेतील प्रत्येक पात्राच्या भूमिकेचा सर्वसमावेशक दृष्टीकोन दाखविते. आमच्या आधीच्या क्राइम थ्रिलरला आमच्या प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे. ‘एक्सप्लोसिव्ह’ साठी सुद्धा आम्ही तशाच सफलतेचा अंदाज बांधला आहे. क्राइम थ्रिलर लेखनशैलीत (जॉनरमध्ये) ही नवी भर पडल्याने वॉचोने देऊ केलेल्या आशयाचे सामर्थ्य वाढविले आहे आणि हे आश्चर्यकारकपणे विविधतेने भरलेले असून देशभरातील आमच्या ग्राहकांची पूर्तता करते.