REPOTER NHI
मुम्बई दि.1 भाजपा- व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापून सुमारे 8 महिने उलटले तरी अद्याप विधानसभेच्या एकाही समिती ची स्थापना झाली नव्हती.. मात्र आज खासदार संजय राऊतांच्या प्रक्षोभक वक्तव्यां नंतर लगोलग हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली. मात्र या समितीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेने च्या एकाही आमदाराला घेण्यात आले नाही.
या हक्कभंग समिती चे आमदार राहुल कुल हे प्रमुख असून आ.अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. यात ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला स्थान मिळालेले नाही.