प्रतिनिधी/-NHI
मुंबई : फ्युजन फॅशन क्वीन २०२३ ची प्रथम विजेती कुमारी केतकी खोत, मयुरेश रहिवाशी संघटना इमारत, काळाचौकी आणि द्वितीय विजेती कुमारी रिया श्रीकांत मसुरकर, विघ्नहर्ता सोसायटी, महादेव पालव मार्ग, करी रोड या दोघींची निवड करण्यात आली. रियाची डिझायनर व इंटरनॅशनल सर्टिफाईड मेकअप आर्टिस्ट कु. समृद्धी शिवराम चव्हाण हिचेही मोलाचे सहकार्य लाभले.
आनंदी प्रतिष्ठान नेहमी महिलांसाठी वार्षिक कार्यक्रम राबवत असतात. आयोजक रुपाली चांदे, संस्थापक-अध्यक्ष, महिला उपविभाग संघटक शिवडी विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्हीजे डान्स स्टुडिओचे संस्थापक विकी जयस्वाल यांच्या सहकार्याने यावर्षी देखील विभागातील मुलींसाठी काहीतरी वेगळे करायचे या विचाराने ‘फॅशन शो’ ही संकल्पना प्रथमच राबवायचे ठरविले.
काळाचौकी विभागातील मुली / महिलांकडून भरघोस प्रतिसाद या स्पर्धेसाठी मिळालाच. परंतु स्पर्धा पाहण्यासाठीसुद्धा मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. स्पर्धेमध्ये नृत्यसुद्धा झाले, ज्यामध्ये काही नृत्याचे दिग्दर्शन हे विकी जयस्वाल यांनी केले होते. अनिल कोकीळ यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
स्पर्धेच्या परीक्षक पूर्वी गडा यांचाही खूप मोठा हातभार लाभला. पूर्वी गडा या Mrs. Brainy Beauty 2021 आणि Fashion Icon पदाच्या मानकरी आहेत.
स्पर्धेचे अँकरिंग सिने अॅक्टर सागर सातपुते यांनी केले, स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेत्या किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, नगरसेवक दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, अनिल कोकीळ, वि.स.सं लता रहाटे, उप.वी.सं. श्वेता राणे, सह.सं. दिव्या घाडीगावकर, वैभवी चव्हाण, शा. प्र. जयसिंग भोसले, अनुराधा इनामदार, भारती पेडणेकर, शारदा बाणे, कांचन घाणेकर, नवऊर्जा फाऊंडेशनच्या धनश्री विचारे आणि मानसी जीवन कामत उपस्थित होत्या.