- मुंबईकरांना महागाईचा “शॉक” !! लवकरच म्हशीचे सुट्टे दूध पाच रुपयांनी महागणार
अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मागायचा आणखी एक शॉक बसणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत गाईच्या दूध विक्री दरात वाढ झाली होती.आता मुंबई दुग्ध उत्पादक संघाने शहरात म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करांचे बजेट गोलमाडू शकते सध्या मुंबईत म्हशीच्या दुधाची विक्री 80 रुपये प्रति लिटर प्रमाणे केली जात आहे. आता यामध्ये पाच रुपयाची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती एम एम पी एन ए दिली आहे त्यामुळे एक मार्चपासून मुंबईकरांना म्हशीचे दूध खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत ही दरवाढ 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे.
मुंबई शहरात तीन हजाराहून अधिक दूध विक्रेते आहेत.या सर्व दूध विक्रेत्यांची अधिकृत संघटना असणारी एमएमपीए चे अध्यक्ष सी के सिंग यांनी या दरवाढीबाबत माहिती दिली. आता शहरातील दूध रिटेलर्स ना 80 रुपये ऐवजी 85 रुपये लिटर प्रमाणे मिळेल. म्हणजेच किरकोळ ग्राहकांना म्हशीचं दूध एक लिटर घ्यायचं असेल तर त्यांना 90 ते 95 रुपये मोजावे लागणार आहेत. नव्या किमती एक मार्च ते 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.