मुंबई : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित अकराव्या इन्शुरन्स शील्ड टी- ट्वेन्टी आंतर कार्यालय क्रिकेट स्पर्धेत रिझर्व्ह बॅंक संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय रिझर्व्ह बँकेने आशीष गंगवालची (14 धावांत 4 बळी) अचूक गोलंदाजी व सलामीवीर संदीप व्ही. याच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे जनरल इन्शुरन्स कंपनीवर 10 विकेट राखून मात केली. संदीप (नाबाद ६६ धावा ) व विश्वास कृष्णा (नाबाद ३१ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ११.१ षटकात १०६ धावांची अभेद्य भागीदारी केली. जनरल इन्शुरन्स संघाने सर्वबाद १०४ धावा केल्या होत्या.
पश्चिम रेल्वे खेळपट्टी-क्रॉस मैदान येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात हृषिकेश पवारची अष्टपैलू कामगिरी (15 धावांत 2 बळी आणि नाबाद 53 धावा) आणि मध्यमगती गोलंदाज शुभम वर्माच्या (7 धावांत 3 विकेट) प्रभावी गोलंदाजीमुळे अरुप्रीत टायगर्स संघाने युनायटेड पटणी इलेव्हनवर 9 विकेट राखून विजय मिळविला.
अरुप्रीत टायगर्सचा हा सलग तिसरा विजय होता. तत्पूर्वी त्यांनी साखळी सामन्यात जनरल इन्शुरन्स कंपनीचा 169 धावांनी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 4 गडी राखून पराभव केला होता. टायगर्स गटात अव्वल ठरून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.