भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुस-या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. हा सामना जिंकून भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. भारतीय संघाने अडीच दिवसात कांगारुंचा खेळ खल्लास केला आहे.
तिस-याच दिवशी ऑस्ट्रेलियावर भारतीय संघाचा दणदणीत विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हॅंड्सकाॅम्ब यांनी हाफ सेंच्यूरी झळकावली. तर भारतीय संघाच्यावतीने शमीने चार आणि अश्विन- जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.
अश्विन- जडेजाची दमदार गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 264 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 262 वर आटोपला गेला. विराट कोहलीने 44 धावा केल्या तर अक्षर पटेलने 74 धावा करत भारताला सावरले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 1 रनची लीड घेतली. त्यानंतर दुस-या डावात रविंद्र जडेजा आणि अश्विनने सटीक मारा करत 10 विकेट्स काढल्या. त्यात जडेजाच्या 7 तर अश्विनच्या 3 होत्या.