“मी तर भाजपाला सोडलंय हिंदुत्व नाही, भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही.” असंही म्हणाले आहेत.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवरच आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ”धनुष्यबाण गुलामांना मिळाल्याने मोगॅंबो खूश हुवा. महाराष्ट्रात आल्यानंतर गळ्यात पट्टा बांधून काही लोक अमित शहांसोबत गेले आहे. मी आजही धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आव्हान देतो मैदानात या माझ्या मशालसोबत सामना करू असे आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि भाजप यांच्यावर घणाघाती टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काल त्यांनी माझा धनुष्यबाण हिसकावून घेतला, आता स्वत: प्रभूरामचंद्र माझ्यासोबत आले आहेत. हा योगायोग म्हणावा की आणखी काय माहीत नाही. परंतु असं कधीकधी अशा गोष्टी होत असतात. मी तर काल रस्त्यावर उतरून आव्हान दिलं आहे. ज्या लोकांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला आहे, त्यांना मी आव्हान दिलं आहे की जर तुम्ही मर्द असाल, तुमच्याच हिंमत असेल तर तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या, मी माझी मशाल घेऊन समोर येतो पाहूयात काय होतं?
PMमोदी बाळासाहेबांचा मुखवटा घालून येतात
उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात यायचे तेव्हा ते बाळासाहेबांचा मुखवटा घालून येतात. देशाला मजबूत बनवणे हे स्वप्न होते. ज्यांना आम्ही दिल्लीत बसवले ते मजबूत झाले पण देश कमकुवत होत आहे. काही लोक खूप ढोंगी आहेत त्यांना मी कुत्रा म्हणणार नाही कारण तो इमानदार असतो. म्हणून मी हा शब्द वापरत नाही. पण कोल्हा, लांडगा ढोंगी शब्द वापरतो.
याशिवाय, “एक गोष्ट नक्की की मागील २५-३० वर्षांपेक्षाही जास्त तुम्ही आणि आम्ही एकमेकांचे विरोधक होतो. काँग्रसे, राष्ट्रवादी आणि शिवसेना मी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीय नाही म्हणत. मग असं काय घडलं की आम्ही तर हिंदुत्ववादी होतो, आजही मी म्हणतो की मी हिंदू आहे, मी हिंदुत्व कधी सोडले नाही आणि सोडणारही नाही. मी तर भाजपाला सोडलंय हिंदुत्व नाही सोडलं. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचं जे हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व नाही. ते आम्हाला मान्य नाही मी उघडपणे सांगतो. जे माझ्या वडिलांनी मला शिकवलं ते हिंदुत्व हे नाही. माझ्या वडिलांच्या भाषेत सांगायचं तर राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. आमचं जे हिंदुत्व आहे ते देशाची जुडलेलं आहे. परंतु यांचं हिंदुत्व सांगतं की आपसात भांडणं लावा, कुटुंबात भांडणं लावा, पक्षात भांडणं लावा आणि सत्ता मिळवा.” असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हिंदु सरकार, मग आक्रोश का?
उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांनी प्रमोद महाजन यांना सांगितले होते की, हिंदु म्हणून सर्वजण मतदान करतील. तो दिवस माझ्या वडीलांनी भाजपला दाखवला. आज हिंदु जागले आहेत पण त्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. हिजाब, गोवंश हे मुद्दे फक्त निवडणुकीत भाजप वापरत आहे. हिंदु आक्रोश मोर्चा मागे काढला. देशाचे पंतप्रधान हिंदु, देशात हिंदु सरकार मग आक्रोश का…?
त्यांना नोंटकी करावी लागते
उद्धव ठाकरे म्हणाले, बोहरा समाजाने मलाही बोलावले पण मी तिथे चपाती लाटली नाही. ज्यांचे काहीच नाते नाही त्यांना चपात्या लाटाव्या लागतात. नोटंकी करावे लागते. ज्यांचे खरे नाते असते त्यांना अशा उचापत्या कराव्या लागत नाही. तुम्ही मुफ्ती मोहमंद यांच्यासोबत बसले होते. महेबूबा मुफ्ती यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती.
कुठपर्यंत लोकांना मुर्ख बनवता
उद्धव ठाकरे म्हणाले, कुठपर्यंत लोकांना ते मुर्ख बनवतील. माझ्या पक्षातील काही लोक तिकडे गेले जाऊद्या पण त्यांनी दुसऱ्या पक्षात जायला हवे. माझ्या वडीलांनी ज्यांना सहारा दिला ते माझ्याच पक्षाचे मालिक बनत आहेत. आमच्या संस्थाही याला चालना देत आहे. आज आमच्यावर प्रसंग ओढावला तो उद्या दुसऱ्यांसोबत घडू शकतो.
ते तळपाय चाटत आहेत
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला त्यांचे तळपाय आमच्यातूनच फूटलेले चाटत आहेत. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो हे सांगितले होते. तरीही ते गेले. माझ्या वडीलांचा चेहारा त्यांना हवा पण मी नको हे असे कसे? निवडणूक आयोगाने जोही निर्णय दिला त्यामुळे आमचे भलेच होणार आहे. काॅंग्रेस आणि इंदीरा गांधींबाबत जो निर्णय दिला तसा निर्णय अपेक्षित होते.
मुंबईला दासी बनवले जातेय
उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण गोठवला मी मशाल घेतली. पण निच आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे. मशालही हिसकावून घेतली आहे. धनुष्यबाण चोरू शकता पण राम चोरू शकत नाही. जोपर्यंत माझ्यासोबत राम तोपर्यंत काहीही होणार नाही. मुंबईला दासी बनवण्याचे कटकारस्थान सुरू आहे.
तुकडे फेकून खूश करण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईची एफडी तोडण्याचा डाव ते करीत आहेत. मुंबईला भीकेचा कटोरा हाती घ्यायला हे लावू शकतात. केंद्र सरकारकडून अजून जीएसटी येणे बाकी आहे. मुंबईचा पैसा केंद्राच्या खिशात ठेवून विकास होणार नाही. मुंबईच्या घामाचा , जीएसटीचा पैसा द्या. सर्व महाराष्ट्रातील गोष्टी गुजरातेत नेत आहेत. मग तोंडावर तुकडे फेकून खूश करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
कोरोनात केंद्राने अडसर आणला
उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना आवाहन केले की, आज माईकशिवाय माझ्या हातात काही नाही. ”मन की बात नही मै दिल की बात करता हु. साथ आणा चाहते हो तो साथ निभाना पडेंगा. ” उत्तर भारतीयांना त्यांच्या राज्यात लाॅकडाऊन काळात जाऊ द्या असे मी म्हटलो पण केंद्राने जाऊ दिले नाही. आता नको असे ते म्हटले होते. सात लाख लोकांना आम्ही ते जिथेही होते तिथे कॅम्प बनवून काळजी घेतली. पण माणसांना शेवटी घरीच जायचे असते. मग साडेसात लाख लोकांना त्यांच्या गावाच्या सीमेवर सोडले.