मुंबई, १७ फेब्रुवारी २०२३: रजनीश वेलनेस लिमिटेड (Rajnish Wellness Ltd) हा वैयक्तिक लैंगिक आरोग्यासाठी विविध आयुर्वेदिक औषधी उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करणारा अग्रगण्य ब्रॅण्ड पूर्व रेल्वेच्या प्रतिष्ठित निविदेसाठी विजेता ठरला आहे. कंपनी ५ वर्षांच्या कालावधीसाठी परवाना आधारावर पूर्व रेल्वेच्या २७० स्थानकांवर हेल्थकेअर केंद्रित मल्टी-युटिलिटी स्टोअर (वेलनेस सेंटर) स्थापन करणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी करार सुरू झाल्यापासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे निविदा दस्तऐवज स्वीकारले आहेत. कंपनी परवाना शुल्काच्या वाढीसह ३.२५ कोटी रूपयांचा पहिला वार्षिक परवाना शुल्क भरेल.
कंपनीला १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्व रेल्वेकडून मंजूरीसह अधिकृत पत्र मिळाले आणि १५ दिवसांच्या कालावधीत ऑफरच्या स्वीकृतीच्या समर्थनार्थ ‘स्वीकृती पत्र’ सादर करण्याची विनंती केली आहे. कंपनीला पहिल्या तिमाहीचे ५० टक्के त्रैमासिक परवाना शुल्क सुरक्षा ठेवीसह १५ दिवसांच्या आत भरण्याची विनंती करण्यात आली आहे. जमा करावयाचे परवाना शुल्क आणि सुरक्षा ठेव यांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
वस्तू रक्कम माध्यम च्या नावे
परवाना शुल्क ४०,६२,५००/- रूपये डिमांड ड्राफ्ट एफए व सीएओ, पूर्व रेल्वे, कोलकाता
सुरक्षा ठेव ३५,८६,६००/- रूपये डिमांड ड्राफ्ट किंवा मुदत ठेव किंवा बँक हमी
अधिक माहिती सांगत रजनीश वेलनेस लि.चे प्रवर्तक व व्यवस्थापकीय संचालक श्री. रजनीशकुमार सुरेंद्रप्रसाद सिंग म्हणाले, ‘‘आम्हाला पूर्व रेल्वेकडून ही प्रतिष्ठित निविदा मिळाल्याचा आनंद होत आहे आणि पुढील ५ वर्षांमध्ये या सहयोगाचा लाभ घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. कंपनीने अलीकडच्या काळात उत्पादन लाइन विस्तारणे, अधिक चॅनेल भागीदार जोडणे इत्यादींवर लक्ष केंद्रित करून महत्त्वाचे धोरणात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. नवीन उत्पादन लॉन्च, किरकोळ फूटप्रिंट्सचा विस्तार याद्वारे वाढीमध्ये गुंतवणूक करण्यावर आमचे दीर्घकालीन लक्ष केंद्रित आहे. आम्हाला आशा आहे की प्रस्तावित विस्तारानंतर आम्ही आमच्या वाढीचे धोरण अशा प्रकारे कार्यान्वित करू, ज्यामुळे सर्व भागधारकांना दर्जेदार उत्पादने सातत्याने वितरीत करता येतील.’’
कराराच्या अंमलबजावणीपर्यंत निविदेच्या अटी व शर्ती खालील तरतूदींसह लागू राहतील.
प्रवाशांच्या हितासाठी मेल/एक्स्प्रेस थांबतात अशी ६ आणखी स्थानके जसे जसिदिह, कहलगाव, बोलपूर, बेरहामपूर कोर्ट, कृष्णनगर आणि रामपुरहाट येथे डॉक्टर्स असण्याची तरतूद.
डॉक्टर्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्थानकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा करण्याची तरतूद.
वैध डब्ल्यूएचओ/जीएमपी प्रमाणपत्रे असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सकडून औषध मिळाली पाहिजेत.
सशुल्क आधारावर स्थानिक सेवा प्रदात्याशी सहयोग करून कॉलवर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे.
जेथे स्टेशन आहे, तेथे त्या राज्याच्या क्लिनिकल स्थापना कायद्याच्या अटींचे पालन केले पाहिजे.
नियुक्त केलेल्या डॉक्टरांची एनएमसीकडून वैध नोंदणी असावी.
या दवाखान्यांमध्ये जवळच्या रुग्णालयांची यादी, आरोग्य सुविधा, उपलब्ध डॉक्टरांचा तपशील प्रदर्शित करावा.
कोणत्याही वैद्यकीय सेवेचे शुल्क प्रवाशांच्या माहितीसाठी प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केले जावे.
रजनीश वेलनेस हे रजनीश हॉट डील प्रायव्हेट लिमिटेडचे विस्तारीकरण आहे. रजनीश हॉट डील प्रायव्हेट लिमिटेडच्या झपाट्याने वाढलेल्या यशामुळे कंपनी आता पब्लिक लिमिटेड कंपनीत बदलली आहे. २००९ मध्ये क्विक सर्विस (क्यूएस) अॅडव्हर्टायझिंग नावाचा लहान टेलिशॉपिंग उपक्रम म्हणून त्याची सुरुवात झाली आणि लोकांच्या वैयक्तिक व लैंगिक आरोग्यासाठी समर्पित आयुर्वेदिक उत्पादन उद्योगातील ब्रॅण्ड म्हणून हा तात्विक व प्रत्यक्षरित्या विकसित झाला. आमच्या लोकप्रिय ब्रॅण्डचा वारसा पुढे चालू ठेवत कंपनी उच्च दर्जाच्या व गुणकारी उत्पादनांचा पुरवठा करते, जी आमच्या ग्राहकांच्या वैयक्तिक व लैंगिक जीवनात सर्वोच्च आरोग्य प्राप्त करण्यास मदत करतात. संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. रजनीशकुमार सुरेंद्रप्रसाद सिंग यांनी वैयक्तिक घरोघरी सेल्समन म्हणून व्यवसाय सुरू केला आणि आज रजनीश वेलनेसमध्ये १९० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
रजनीश वेलनेस ग्राहकांच्या वैयक्तिक लैंगिक आरोग्यासाठी विविध आयुर्वेदिक औषधी उत्पादनांची विक्री करणारा ब्रॅण्ड आहे. आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये आयुर्वेदिक एथिकल औषधे, पर्सनल केअर उत्पादने, औषधी लैंगिक संवर्धन उत्पादने समाविष्ट आहेत, जी वैद्यकीय काउंटर्सवर सहज उपलब्ध आहेत. आमचा फ्लॅगशिप ब्रॅण्ड ‘प्लेविन’ने आमच्या ग्राहकांसाठी लैंगिक स्वास्थ्याला नवीन उंचीवर नेले आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पुरुष व महिला दोघांनाही कमी लैंगिक भावना आणि असमाधानी लैंगिक जीवनाचा अनुभव येतो. दर्जेदार लैंगिक जीवन देण्यासाठी प्लेविन महिला व पुरुष दोघांच्या लैंगिक संवर्धनाची काळजी घेते.
कंपनीची उत्पादने Amazon.in, snapdeal.com, indiamart.com, clickoncare.com, lovenaturalremedies.com, ayurvedmart.com आणि fineyog.com इत्यादी सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध आहेत. कंपनीचा विश्वास आहे की, प्रत्येकाने तणावमुक्त आणि उत्तम दर्जाचे जीवन जगले पाहिजे. तुमचे आरोग्य व जीवन उत्तम असण्याचे तुमचे ध्येय साध्य करण्यामध्ये साह्य करण्यासाठी कंपनी सतत जागरूकपणे प्रयत्नरत आहे.