मुंबई : रक्त हे तयार करता येत नसून ते मानवाच्या शरीरातूनच उपलब्ध होते, हे सत्य जाणून तसेच आपण आपले कर्तव्य समजून आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणा-या माता यशोदा परिवार व एस. जी. फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी-२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते २.३० वा. दरम्यान अमरदीप बिल्डींग पटांगण, काळाचौकी, हकोबा समोर, मुंबई ४०० ०३३ येथे करण्यात आले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने विशेषतः युवा वर्गाने सहभागी होऊन रक्तदान मोहीम यशस्वी करावे, असे तृतीय रक्तदान शिबिराप्रसंगी आवाहन डॉ. प्रागजी वाजा व ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण हरचांदे यांनी केले आहे. रक्तदान शिबिराला अमरदीप रहिवाशी संघ, एस.बी.क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब-सातरस्ता,महाराजा ग्रुप-भोईवाडा, मांजरेकर डेकोरेटर आदी संस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे. रक्तदात्यांनी नोंदणी करण्यासाठी शंकर गावकर अथवा संदेश गावकर (९८६९४ ३८११८) यांच्याकडे उपरोक्त स्थळी संपर्क साधावा.