कल्याण दि. १३ (प्रतिनिधी) : आदित्य बिर्ला ग्रुपमधील रियल इस्टेट कंपनी बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने कल्याण शहरात मोक्याच्या जागी असलेल्या बिर्ला वन्य या आपल्या प्रीमियम प्रकल्पामध्ये आज एक संस्मरणीय व अतिशय अनोख्या साउंड अँड लाईट शोचे आयोजन केले होते. हा साउंड अँड लाईट शो याप्रकारचा पहिलाच शो असून बिर्ला वन्यच्या चॅनेल पार्टनर मीटचा एक भाग म्हणून एका इमारतीवर आयोजित करण्यात आला होता. बांधकामाच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यात पोहोचलेल्या या प्रकल्पामध्ये रहिवाशांना अतुलनीय अनुभव कसे मिळतील आणि त्यांच्या उच्च महत्त्वाकांक्षा याठिकाणी कशा पूर्ण होतील हे सर्वांसमोर मांडण्यासाठी या साउंड अँड लाईट शोची निर्मिती करण्यात आली होती.
या शानदार शोबद्दल अधिक माहिती देताना बिर्ला इस्टेट्सचे एमडी आणि सीईओ श्री. के टी जितेंद्रन यांनी सांगितले, “उत्कृष्टता आणि परिपूर्णता याकडे नेणारा मार्ग निर्माण करण्यात पुढाकार घेणे हे बिर्ला उद्योगसमूह आणि त्यांच्याकडून बिर्ला इस्टेट्सने देखील अंगिकारलेले मूल्य आहे. संपूर्ण जीवनभरासाठी प्रीमियम राहतील अशा जागा निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्नशील राहून बिर्ला इस्टेट्समध्ये आम्ही या मूल्याचे पालन करतो. बिर्ला वन्य हा प्रकल्प याच प्रयत्नांचा एक भाग आहे ज्यामध्ये आम्ही आमच्या रहिवाशांना अतुलनीय जीवनशैली लाईफडिजाईन्डचे वचन देत आहोत. आमच्या वाटचालीतील हा पुढील टप्पा गाठल्याचा आनंद शानदार व अतुलनीय पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही हा साउंड अँड लाईट शो तयार केला आहे. याठिकाणी उपस्थित राहून आणि या आनंदात सहभागी होऊन आमच्या चॅनेल पार्टनर्सनी या संपूर्ण आयोजनाची रंगत कैक पटींनी वाढवली.” असे ते यावेळी म्हणाले .