पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला.
MC Stam Won Bigg Boss 16 Trophy: बिग बॉस १६’ला अखेर त्याचा विजेता मिळाला. गेल्या १९ आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमच आज ग्रँड फिनाले पार पडला. या ग्रँड फिनाले मध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
बिग बॉस 16’च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांच्यात लढत होती. शालिन आणि अर्चना यांना अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. प्रियांका चौधरीचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर येऊन थांबला.
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रविवारी (१२ फेब्रुवारी) पार पडला. यंदा बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अखेर रविवारी रात्री उशिरा बिग बॉस हिंदीच्या विजेत्याची घोषणा झाली. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला.
रविवारी (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. यंदा ‘बिग बॉस’च्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले. त्यांच्यात विविध गंमतीजमतीही पाहायला मिळाल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन केले. यंदा ‘बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले. या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
यावेळी सर्वप्रथम एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला. यामुळे शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी हे तीन जण बिग बॉसचे टॉप ३ स्पर्धक ठरले. यानंतर सलमान खानने टॉप २ सदस्य म्हणून शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांच्या नावाची घोषणा केली. तर प्रियांकाचा या घरातला प्रवास संपल्याचे सांगितले. यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
Bigg Boss 16 : रविवारी ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) शोच्या विजेत्याची घोषणा झाली आणि चाहत्यांसह विजेत्याने मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. अभिनेता आणि बिग बॉस १६’ शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने विजेत्याचं नाव घोषित केलं आणि स्पर्धकांसह चाहते देखील चकित झाले. बिग बॉस १६’ मध्ये शिव ठाकरे (shiv thakare) आणि प्रियंका चौधरी यांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होती. पण ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीवर एमसी स्टॅनचं नाव कोरलं गेलं. सध्या सर्वत्र एमसी स्टॅन याच्या नावाची चर्चा आहे. ‘बिग बॉस १६’ च्या विजेत्याची घोषणा केल्यानंतर शिव ठाकरेला, ट्रॉफी एमसी स्टॅन (MC Stan) याला मिळाल्यानंतर तू नाराज आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शिव याने प्रतिक्रिया दिली आहे.
शिव म्हणाला, ‘जे व्हायचं होतं ते झालं… ट्रॉफी माझ्या मंडळीतील एमसी स्टॅन घेवून गेला. त्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे. शिवाय शेवटच्या दिवसापर्यंत विजयी होण्यासाठी मी प्रयत्न केलं. जी गोष्ट मी मनापासून केली, ती मला भेटली आहे. अनेकांनी माझं कौतुक केलं, मला पाठिंबा दिला… लोकांचं प्रेम घेवून मी बाहेर निघालो आहे..’ (MC Stan lifestyle)
पुढे शिव म्हणाला, ‘काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण काही गोष्टी आपल्या उज्वल भविष्यासाठी होत असतात. कारण आपल्या मनात जी जिंकण्याची भूक असते ती अधिक तिव्र होते आणि विजयाची भूक आता माझी वाढली आहे. पुढचा दरवाजा वाट पाहत आहे. जे काही करेल ते मेहनतीने आणि जिद्दीने करेल… कायम माझ्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहिल…’ असं देखील शिव ठाकरे म्हणाला.
सांगायचं झालं तर, बिग बॉसनंतर शिव ठाकरे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘खतरो के खिलाडी १३’ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता शिवला नव्या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. सोशल मीडियावर देखील शिव ठाकरे याच्या चर्चा रंगलेल्या असतात. खुद्द बिग बॉसने देखील शिव ठाकरेचं शोच्या आठवड्यात कौतुक केलं आहे. ( Bigg Boss 16 Winner MC Stan)
बिग बॉसने केलं शिव ठाकरे याचं कौतुक
शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द बिग बॉस यांनी शिव ठाकरे याचं कौतुक केलं आहे. ज्यामुळे शिव प्रचंड भावुक झाला आणि ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तू दाखवून दिलं आहेस. असं देखील बिग बॉस म्हणाले. (shiv thakare instagram)