राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार यांना पुढेचे मुख्यमंत्री बनवायचे असून कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे त्यांनी सांगितले होते. या बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे.
नाशिक : अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पदाची सर्व कौशल्य असूनही ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. दरम्यान, अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादीचे स्टार आमदार नीलेश लंके यांनी केले होते. दरम्यान, लंके यांच्या या व्यक्तव्या बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. नाशिकमध्ये बोलताना लंके यांच्या विधानाशी सहमती अगर नापसंतीही व्यक्त न करता केवळ संख्याबळाचे समीकरण पवार यांनी समोर ठेवले आहे.
दरम्यान, नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधतांना शरद पवार यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले, ‘कोणाला काहीही आवडू शकते. मात्र, तुमचे तेवढे संख्याबळ असले पाहिजे ना? जर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात क्रमांक एकचा पक्ष असता तर सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतले असते. मात्र, आज आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे सध्या तरी यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही’, असं सांगत पवार यांनी हा विषय संपवला.