माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहकारी बँकांमधील नामवंत ३४ संघांमध्ये ११ व १२ फेब्रुवारीला शिवाजी पार्क मैदानात चुरशीचे सामने क्रिकेट शौकिनांना पाहण्यास मिळतील.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. बँक, मुंबै बँक, मराठा सहकारी बँक, मोगविरा को-ऑप. बँक, मालाड सहकारी बँक, द.म.क. जावळी सहकारी बँक, सातारा सहकरी बँक, ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बँक, जीएस महानगर को-ऑप.बँक, सिटी को-ऑप. बँक, कपोल को-ऑप. बँक, हिंदुस्थान को-ऑप. बँक, वैश्य सहकारी बँक, एस.टी. को-ऑप. बँक, वसई विकास को-ऑप. बँक, ठाणे भारत को-ओप. बँक, कोकण मर्कन्टाईल को-ऑप. बँक, अपना सहकारी बँक, नेव्हल डॉकयार्ड बँक, विमा कामगार को-ऑप.बँक, एनकेजीएसबी को-ऑप. बँक, म्युनिसिपल को-ऑप. बँक, झोरास्ट्रीयन बँक आदी सहकारी बँकांचे खेळाडू विजेतेपदाच्या संभाव्य दावेदारीसाठी पूर्ण तयारीनिशी खेळणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ९.०० वा. होणार असून अंतिम सामना रविवारी सायंकाळी ५.०० वा. माहीम ज्युवेनील स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवर होईल. अंतिम विजेत्या व उपविजेत्यांना आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, प्रवीण शिंदे आणि इतर पदाधिकारी कार्यरत आहेत.
**********