नवी दिल्ली ; मोटोरोलाने आज आपला स्वस्त स्मार्टफोन ‘moto e13’ लॉन्च केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यात 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
64GB स्टोरेज मिळेल
मोटोरोलाने ने हा फोन दोन मॉडेलमध्ये लॉन्च केला आहे. यात 2GB रॅमसह 64GB स्टोरेज आणि 4GB रॅमसह 64GB स्टोरेज पर्याय मिळेल. 2GB रॅम वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे आणि 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे, परंतु Jio एक्सक्लुझिव्हचा फायदा घेत, फ्लॅट 700 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
6.5 इंच LCD डिस्प्ले
या मोटोरोला मोबाइल फोनमध्ये 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळेल जो एचडी प्लस (720 × 1600 पिक्सेल) रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच आहे ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
13-मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी फ्रंट-फेसिंग 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T606 प्रोसेसर उपलब्ध असेल.
3 रंग पर्याय मिळतील
हा फोन क्रीमी व्हाइट, अरोरा ग्रीन आणि कॉस्मिक ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये Type-C चार्जिंग पोर्ट, ड्युअल सिम कार्ड सपोर्ट, ब्लूटूथ 5.0, 10W चार्जर, IP52 वॉटर-रिपेलेंट डिझाइन आणि ड्युअल-बँड वाय-फाय यांचा समावेश असेल.