आलियाने नुकताच योगा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया भट्ट खाली डोकं वर पाय करून एरियल योगा करताना दिसत आहे.
आलिया भट्टने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘प्रसूतीच्या दीड महिन्यानंतर, हळूहळू मी माझ्या गोष्टी हाताळत आहे. आज मी माझ्या योग शिक्षिका अंशुका योगाच्या मदतीने हे करू शकले आहे. माझ्याप्रमाणेच नुकताच बाळाला जन्म दिलेल्या मातांनी प्रसूतीनंतर त्यांचे शरीर समजून घेतले पाहिजे. मात्र, तुमचे मन जे करायला तयार नाही, असे काहीही करू नका. वर्कआऊट्सच्या पहिल्या आठवड्यात मी फक्त श्वास घेतला, चालले. यातून मी माझी स्थिरता आणि संतुलन परत मिळवले. त्यामुळे तुम्ही देखील तुमचा वेळ घ्या. तुमच्या शरीराचे कौतुक करा.’
आलिया भट्टने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘बाळाला जन्म देणे ही एक जादू आहे. आपल्या शरीरावर प्रेम आणि काळजी घ्या. प्रत्येक शरीर वेगळे असते, कृपया कोणताही व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचे मत विचारा आणि सल्ला घ्या.’ आलिया भट्टच्या या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. आलियाला पाहून आपल्याला प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. तर, बॉलिवूड कलाकार देखील तिचे कौतुक करत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. आलिया भट्टने नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. प्रसूतीच्या दीड महिन्यानंतर आता आलिया पुन्हा एकदा वर्कआऊट आणि योगाच्या मदतीने स्वतःची काळजी घेऊ लागली आहे. तिने नुकताच योगा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया भट्ट खाली डोकं वर पाय करून एरियल योगा करताना दिसत आहे. स्वतःचा हा फोटो शेअर करताना तिने खास कॅप्शन देखील लिहिले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई झाल्यानंतर तिच्या फिटनेसकडे सध्या खूप लक्ष देत आहे. आलिया अनेकदा योगा आणि जिम करताना दिसते. दरम्यान, आलियाचा एक वर्कआउट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या घरी 108 सूर्यनमस्कार करताना दिसली. या व्हिडिओमध्ये आलिया खूपच क्यूट दिसत आहे. व्हिडिओमध्ये बहीण शाहीन तिला विचारते की, तुला आता कसे वाटत आहे? त्यावर आलिया म्हणाली – ‘पॉवरफुल’.
व्हिडिओमध्ये आलिया ‘नो मेकअप लूक’मध्ये खूपच क्यूट दिसत असून चेहऱ्यावर जबरदस्त ग्लो आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहते सोशल मीडियावर आलियाचे कौतुक करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आलिया तू खूप क्यूट आहेस’. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘तू मेकअप न करताही खूप सुंदर दिसतेस’. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत रणवीर सिंग देखील दिसणार आहे.