बलुचिस्तान : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात भीषण दुर्गटना घडली आहे. बलुचिस्तान येथील लासबेला परिसरात एक प्रवासी बस दरीत कोसळून किमान ३९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनलद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. क्वेटाहून कराचीला जाणाऱ्या या बसमध्ये एकूण ४८ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळत आहे. तरी यांतील तब्बल ३९ जणांचा जागीच मृत्यू होण ही मोठी दुर्दैवी बाब आहे. दरम्यान बसचा वेग अधिक असल्याने यू टर्न घेतना बस पुलाच्या पिलरवर आदळून दरीत कोसळली आणि उंचावरुन बस कोसळल्याने बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.