राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीची आई जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. राखीला अनेकवेळा हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. राखी अनेकदा मीडियासमोर तिच्या आईच्या तब्येतीचे अपडेट्स देताना दिसली. तसेच ती चाहत्यांना सतत आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत असे. जया यांच्या निधनामुळे राखी आणि तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.