शुभांगी ही नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकत होती. तिचे लग्न काही महिन्यांपूर्वीच निश्चित झाले होते. गावातील तरुणाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिचे लग्न मोडले. समाजात बदनामी झाल्याच्या रागातून तिची हत्या करण्यात आली होती.
Shubhangi Jogdand Murder Case: नांदेडच्या पिंपरी महिपाळ गावात प्रेमप्रकरणातून मुलीचा मृतदेह जाळल्याची घटना समोर आली होती. शुभांगी जोगदंड (Shubhangi Jogdand) या वैद्यकीय विद्यार्थिनीची तिचे वडील, भाऊ आणि मामाने हत्या (Murder) केली होती. शुभांगीचा खून केल्यानंतर तिचे राख आणि हाडे नाल्यात फेकून देण्यात आले होते. अशा स्थितीत पोलिसांसमोर पुरावे गोळा करण्याचे आव्हान होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना लिंबगाव पोलिसांना हिवरा परिसरातील एका नाल्यात हाडे सापडली. पुढील तपास फॉरेन्सिक टीम करत आहे. ही हाडे शुभांगीची आहेत की नाहीत हे सिद्ध करण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येईल. या चाचणीनंतर शुभांगीच्या मृत्यूप्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांच्या हाती लागणार आहे.
शुभांगी जोगदंड हत्याकांडातील अनेक पैलू अद्याप समोर आलेले नाहीत. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. शुभांगीच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रेमप्रकरणातून हा खून तिच्याच वडिलांनी व नातेवाईकांनी केल्याचे समोर आले आहे. वडील, भाऊ आणि मामासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एका निनावी फोन कॉलने शुभांगीच्या हत्येचा खुलासा केला आणि पोलिसांनी तपास सुरू केला होता.
शुभांगी ही नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकत होती. तिचे लग्न काही महिन्यांपूर्वीच निश्चित झाले होते. गावातील तरुणाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिचे लग्न मोडले. समाजात बदनामी झाल्याच्या रागातून तिची हत्या करण्यात आली. शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड (48), भाऊ कृष्णा (19), गिरधारी (30), गोविंद (32) आणि केशव शिवाजी कदम (37) अशी आरोपींची नावे आहेत.