राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकावला तिरंगा; जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर असं करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावला. भारत जोडो यात्रेत महिलांसह काँग्रेस समर्थकांनीही पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी लोकांच्या हातात पक्षाचे झेंडेही पाहायला मिळाले.

Jammu and Kashmir: राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकावला तिरंगा; जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर असं करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते

Rahul Gandhi unfurled the tricolor at Lal Chowk (PC – ANI)

Jammu and Kashmir: काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी श्रीनगरमधील पंथा चौकातून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. यानंतर भारत जोडो यात्रा लाल चौकाकडे (Lal Chowk) रवाना झाली. जिथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावला. भारत जोडो यात्रेत महिलांसह काँग्रेस समर्थकांनीही पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी लोकांच्या हातात पक्षाचे झेंडेही पाहायला मिळाले. भारत जोडो यात्रेने शहरातील सोनवार भागापर्यंत सात किलोमीटरचे अंतर कापले. तेथे काही काळ थांबल्यानंतर यात्रा पुढील प्रवासाला निघाली. जिथे लाल चौकात राहुल गांधींनी तिरंगा फडकवला.

भारत जोडो यात्रेसाठी लाल चौकाच्या आसपासचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. तसेच शहराच्या मध्यभागी एक बहुस्तरीय सुरक्षा घेरा तैनात करण्यात आला होता. लाल चौकानंतर भारत जोडो यात्रा शहरातील बुलेवर्ड परिसरातील नेहरू पार्कलाही भेट देणार आहे.

 

 

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 4 हजार 80 किलोमीटर अंतर कापून श्रीनगरमध्ये संपेल. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा देशभरातील 75 जिल्ह्यांमध्ये पोहोचली. राहुल गांधी सोमवारी एमए रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवतील, त्यानंतर एसके स्टेडियमवर जाहीर सभा होईल. या मेळाव्यासाठी 23 विरोधी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News