मुंबई: क्रीडा प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या रचित शाह याने (5/8 सीडेड) अव्वल मानांकित कर्नाटकच्या राहुल बालकृष्णन याच्यावर उपांत्य फेरीत चुरशीच्या लढतीत 12-10, 11-8, 8-11, 13-15, 11-9 असा विजय मिळवत के. एच. रांभिया मेमोरियल जुहू विलेपार्ले जिमखाना ज्युनियर स्क्वॉश खुल्या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली.
पहिले दोन गेम जिंकून रचितने आघाडी घेतली. मात्र, राहुलने पुढील दोन्ही गेम जिंकत सुरेख कमबॅक केले. पाचव्या आणि निर्णायक गेममध्ये रचितने खेळ उंचावताना गेमसह सामना आपल्या नावे केला. याच गटातील दुसर्या सेमीफायनलमध्ये पुरव रांभियाने चांगलेच झुंजवले तरी त्याचा सहकारी महाराष्ट्राचा अंशुमन जयसिंगने (6-11, 11-8, 12-10, 5-11, 11-5) आगेकूच केली.
19 वर्षांखालील मुले गटात अव्वल मानांकित ओम सेमवालने (महाराष्ट्र) पहिला गेम गमावूनही महाराष्ट्राच्या विवान शहा (3/4) याचा 8-11, 11-3, 12-10, 11-7 असा पराभव केला. अंतिम लढतीत सेमवालची गाठ दुसर्या मानांकित शरण पंजाबी याच्याशी (महाराष्ट्र) पडेल. त्याने धैर्य शाहवर (महाराष्ट्र)11-7, 11-2, 11-3 अशी मात केली.
आकांक्षा गुप्ताने मुलींच्या 17 वर्षांखालील विजेतेपदाच्या दिशेने कूच सुरू ठेवली असून अंतिम फेरीत तिची लढत करीना फिप्सशी होईल.
निकाल (उपांत्य फेरी)-
19 वर्षांखालील मुले: ओम सेमवाल (महाराष्ट्र) (1) विजयी वि. विवान शाह (महाराष्ट) (3/4) 8-11, 11-3, 12-10, 11-7; शरण पंजाबी (महाराष्ट) (2) विजयी वि. धैर्य शाह (महाराष्ट) (5/8) 11-7 11-2 11-3.
17 वर्षांखालील मुले: आदित्य चांदणी (महाराष्ट्र) (1) विजयी वि. तनिश वैद्य (महाराष्ट्र) (5/8) 11-5, 11-5, 11-3; अर्जुन सोमाणी (महाराष्ट्र) (3/4) विजयी वि. रुद्र लखानी (महाराष्ट्र) (5/8) 11-5, 13-11, 7-11, 11-6.
17 वर्षांखालील मुली: आकांक्षा गुप्ता (महाराष्ट्र) लीं महिका रक्षित (महाराष्ट्र) 11-2, 11-0, 11-5; करीना फिप्स (महाराष्ट्र) (3/4) विजयी वि. अमृता राजलक्ष्मी (तामिळनाडू) 11-1, 11-5, 11-4.
15 वर्षांखालील मुले: रचित शाह (महाराष्ट्र) (5/8) विजयी वि. राहुल संजय बालकृष्णन (कर्नाटक) (1) 12-10, 11-8, 8-11, 13-15, 11-9; अंशुमन जयसिंग (महाराष्ट्र) (2) विजयी वि. पुरव रांभिया (महाराष्ट्र) (5/8) 6-11, 11-8, 12-10, 5-11, 11-5.
15 वर्षांखालील मुली: व्योमिका खंडेलवाल (तामिळनाडू) (1) विजयी वि. दिवा शाह (महाराष्ट्र) (3/4) 9-11, 11-9, 2-11, 11-8, 11-9; अनिका दुबे (महाराष्ट्र) (2) विजयी वि. छवी सरन (राजस्थान) (3/4) 11-4, 11-5, 12-10.
13 वर्षांखालील मुले: रुद्र पठानिया (छत्तीसगड) (1) विजयी वि. श्रेयांश झा (महाराष्ट्र) (5/8) 11-6, 11-6, 11-6; हर्षल राणा (एचआर) (2) विजयी वि. विहान दास (मध्य प्रदेश) (3/4) 11-9, 11-5, 11-4.
13 वर्षांखालील मुली: अरोमा (उत्तर प्रदेश) (1) विजयी वि. दीपशिखा थोरात (कर्नाटक) (5/8) 11-7, 11-4, 11-2; सानवी कलंकी (मध्य प्रदेश) (2) विजयी वि. डी. नितियाश्री (तामिळनाडू) (3/4) 10-12, 11-2, 14-16, 11-3, 11-8.
11 वर्षांखालील मुले: साहिल वाघमारे (महाराष्ट्र) (1) विजयी वि. आदित्य शाह (महाराष्ट्र) (3/4) 11-6, 11-2, 11-2; प्रभाव बाजोरिया (राजस्थान) (2) विजयी वि. शौर्य रक्षित (महाराष्ट्र) (3/4) 11-4, 12-10, 11-2.
11 वर्षांखालील मुली:आशी शाह (महाराष्ट्र) (1) विजयी वि. शनाया रॉय (महाराष्ट्र) (3/4) 11-7, 11-2, 11-9; सुधांजली यादव (महाराष्ट्र) (3/4) विजयी वि. याशिका विनोदकुमार (तामिळनाडू) (2) 11-8, 11-5, 11-5.