श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई, ठाणे परिसरातील १७ वर्षाखालील व ५५ किलो वजनाखालील मुलामुलींच्या शालेय संघांची श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धा ८ व ९ फेब्रुवारी रोजी दादर-पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली आहे. हि शालेय कबड्डी स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची असून प्रथम येणाऱ्या शालेय मुलांच्या व मुलींच्या प्रत्येकी ३२ शालेय कबड्डी संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी संघांतील सर्व खेळाडूना विनामूल्य टी शर्ट व अल्पोपहार व्यवस्था करण्यात येणार आहे.
श्री उद्यानगणेश शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील प्रत्येक अंतिम विजेत्यास रोख रु.५,०००/- व चषक, अंतिम उपविजेत्यास रोख रु.३,०००/- व चषक आणि तृतीय क्रमांकास रोख रु.२,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक रोख पुरस्कार आहेत
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या अथवा मुलींच्या शालेय कबड्डी संघांनी प्रवेश अर्जासाठी विश्वस्त प्रकाश परब अथवा व्यवस्थापक संजय आईर (८६५५२३३७७८), श्री उद्यान गणेश मंदिर कार्यालय (९३२१२ ९३६३८), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे २९ जानेवारीपर्यंत संपर्क साधावा.