‘आरोग्य सेवा क्षेत्राचं मेडिकल टुरिझमकडे वाटचाल होणं गरजेचं यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल’’ – उपमुख्यमंत्री
मुंबई – भारती विद्यापीठ मेडिकव्हर रुग्णालयातफेँ नवी मुंबईत ३१० खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उदघाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नवी मुंबई आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवणं, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या उदघाटन कार्य़क्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेचे सदस्य सुनिल तटकरे, श्रीरंग बारने, आमदार प्रशांत ठाकूर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्रो कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विदयापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, मेडिकव्हर रूग्णालयाचे (इंडिया) अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा, मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रीक स्टेनमो आदी मान्यवर उपस्थित होते.
मेडिकव्हर ग्रुपचे संपूर्ण भारतात एकूण २४ रुग्णालये आहेत. रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी या रूग्णालयात आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात रूग्णालयात कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ऑन्कोलॉजी, बालरोग, स्त्रीरोग, पल्मोनोलॉजी, ईएनटी आणि इतर स्पेशॅलिटीजचा समावेश आहे, ज्यामध्ये उच्च पात्र डॉक्टर, विशेषज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत.
भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्रो कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, भारती विद्यापीठाची स्थापना पंतगराव कदम यांनी बहुजन समाजातील नागरिकांसाठी केली आहे. आजवर या भारती विद्यापीठाची शाखांचा देशभरात विस्तार झालेला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना उच्च शिक्षण मिळावेत, या हेतूनं ८५ गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. भारती विद्यापीठाचे शैक्षणिक व रिसर्चक्षेत्रात महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हर या ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी काम करत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारती विद्यापीठाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मानव संशोधन निर्माण केले आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणं हे भारतीय विद्यापीठाची खासियत आहे. पण आता भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हर च्या संयुक्त विद्यामाने एक नवीन रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. कोरोना काळानंतर जगभरातील प्रगत देशांनाही आरोग्य क्षेत्रातील उणिवा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे देशासह जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात आपल्याला काम करण्याची गरज लक्षात आली आहे. त्यातूनच आज मोठ्याप्रमाणात परिवर्तन होताना दिसून येत आहे. दोन-तीन दशकांपासून आरोग्य क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहेत. हेल्थ केअर क्षेत्र हेल्थ टूरिझमच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. या हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे मेडिकव्हर सारख्या संस्था तयार होणं गरजेचं आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हर च्या संयुक्त विद्यामाने हे रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. मेडिकव्हर ही संस्था देशभरात वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे. युरोपिन समुहाशी भागीदार झाल्यामुळे युरोप खंडातील वैद्यकीय व्यवसायी मानक भारतात यायला मदत होईल. महाराष्ट्रातील सरकारी रूग्णालयात रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याशिवाय परदेशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रूग्णांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार उचलतो. परंतु, आपल्याकडे वैद्यकीय सुविधांवर फक्त २५ टक्के खर्च केला जातो. ७५ टक्के खर्च हा रूग्णांना करावा लागतो. यंदाच्या बजेटमध्ये ग्रामीण भागातील लोकांना वैदयकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वैद्यकीय सुविधावर शासकीय खर्चाच प्रमाण वाढवण्यात यावेत. जेणेकरून गरजू रूग्णांना याचा फायदा मिळेल.
मेडिकव्हर रुग्णालयाचे (इंडिया) अध्यक्ष आणि वैद्यकिय संचालक डॉ. अनिल कृष्णा म्हणाले की, मेडिकव्हर रूग्णालयाने आपला सात वर्षांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. नवीन हॉस्पिटल सुरू करण्यामागील प्रमुख उद्दिष्ट या क्षेत्रातील उपलब्ध आरोग्यसेवा सुधारणे हे होते. आतापर्यंत देशभरात मेडीकव्हर ग्रुपचे २४ रूग्णालय असून सर्वत्र या वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तळागाळातील नागरिकांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सोयीसुविधा पुरविणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या पुणे, नवी मुंबई, नाशिक, औऱंगाबाद और संगमनेर याठिकाणी पाच रूग्णालये कार्यरत आहेत.
मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रीक स्टेनमो म्हणाले की, जगभरात मेडिकव्हर रूग्णालयातर्फे लोकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात काम करण्यात येत आहे. मेडिकव्हर रूग्णालयात मिळत असलेल्या दर्जेदार वैद्यकीय सुविधांवर लोकांचा विश्वास आहे, हेच आमचे यश आहे. भारतातील विविध तीन राज्यात मेडिकवर रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मेडिकव्हरचे सध्या २४ रूग्णालये असून यात पाच हजार खाटांची सुविधा आहे. देशभरात मेडिकव्हर रूग्णालयाचा विस्तार करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. उत्तम वैद्यकीय उपचार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सर्व सुविधा भारतीयांना पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील विविध शहरात मेडिकव्हर रूग्णालयाची स्थापना करण्यात येत आहेत. एकाच खाटांसाठी रूग्णांना सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय भारतातील ग्रामीण भागात ४० हजारहून अधिक मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत भारतात ५० रूग्णालये स्थापना करण्याचे मेडिकव्हर ग्रुपचे उद्दिष्ट आहे. यात १०,००० खाटांची संख्या असणार आहे. आणि २५ हजार कर्मचारी कार्यरत असतील.