
प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडने भारतासमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला 20 षटकानंतर 9 गडी गमावून 155 धावाच करता आल्या. भारताचे पहिले 3 फलंदाज अवघ्या 20 धावांतच तंबूत परतले. त्यानंतर ही घसरगुंडी कायमच राहीली. अर्धा भारतीय संघ 89 धावात गडगडला. त्यानंतर वाशिंग्टन सुंदर याने चमकदार आणि एकाकी खेळी केली; पण तो अखेरच्या षटकात झेलबाद झाला. यानंतर आलेल्या फलंदाजाने फक्त औपचारिकता पूर्ण केली भारताचा पराभव झाला.
अजिंक्य विक्रम मोडीत
टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 21 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. यासह भारतीय संघ 3 सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत 0-1 ने पिछाडीवर गेला आहे. या पराभवासह रांचीच्या मैदानावरील भारताचा अजिंक्य विक्रम मोडीत निघाला आहे. यापूर्वी संघाने येथे एकही टी- 20 सामना गमावला नाही.
धोनीच्या मुळ गावी सामना
धोनीच्या मूळ गावी रांची येथे आजचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 176 धावा केल्या. त्यानंतर भारताचे फलंदाज निर्धारित षटकांत 155 धावांतच रोखले गेले. किवी संघाच्या विजयाचे हिरो होते डॅरिल मिशेल आणि मिचेल सँटनर. मिचेलने 30 चेंडूत 59 धावांची खेळी खेळली. तर मिचेल सँटनरने चार षटकांत एका मेडनसह 11 धावांत दोन बळी घेतले.
भारतीय संघाच्या पराभवाची कारणे
- शेवटच्या षटकात 27 धावा अर्शदीप सिंगने पहिल्या डावातील शेवटच्या षटकात 27 धावा लुटल्या. डॅरिल मिशेलने पहिल्या 3 चेंडूत 3 षटकार ठोकले. या धावा झाल्या नसत्या तर भारताला जिंकण्यासाठी कमी लक्ष्य मिळाले असते.
- टॉप ऑर्डर फ्लॉप भारताची टॉप ऑर्डर 177 धावांच्या लक्ष्यात खराबपणे फ्लॉप झाली. शुभमन गिल 7 आणि ईशान किशन 4 धावा करून बाद झाले. त्याचवेळी राहुल त्रिपाठीही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
- नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने खेळपट्टीकडे दुर्लक्ष केले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीत फिरकीपटूंना मदत मिळाली. प्रथम फलंदाजी केली असती तर मोठी धावसंख्या उभारून न्यूझीलंडला दडपणाखाली आणता आले असते. दुसऱ्या डावात फिरकीपटूंना अधिक मदत मिळाली आणि भारताला लक्ष्य गाठता आले नाही.
टीम इंडियाच्या अशा पडल्या विकेट्स
पहिला: दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर इशान किशनला मायकल ब्रेसवेलने बोल्ड केले.
दुसरा: जेकब डफीने राहुल त्रिपाठीला ड्वेन कॉनवेकरवी झेलबाद केले.
तिसरा: चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिचेल सँटनरने शुभमन गिलला फिन ऍलनकरवी झेलबाद केले.
चौथा: 12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सूर्या ऍलनला झेल देवून बसला. त्याला ईश सोधीने बाद केले.
पाचवा: 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पंड्या ब्रेसवेलकडे झेलबाद झाला.
सहावा: सँटनरच्या कॉनवेने हुडाला यष्टीचीत केले.
सातवा : शिवम मावी धावबाद झाला.
आठवा : कुलदीप यादवला लोकी फर्ग्युसनने बोल्ड केले.
नववा : वाशिंग्टन सुंदर अखेरच्या षटकात झेलबाद झाला.
भारत-न्यूझीलंड 1ली T20 स्कोअरकार्ड
न्यूझीलंडचा डाव
डॅरिल मिशेल आणि ड्वेन कॉनवे यांनी सहाव्या विकेटसाठी 6 चेंडूत 27 धावांची भागीदारी केली.
न्यूझीलंडने 176 धावा केल्या
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. डॅरिल मिशेलने सर्वाधिक नाबाद 59 धावा केल्या. सलामीवीर ड्वेन कॉनवेने 52 धावांचे योगदान दिले. फिन ऍलनने 35 धावांची धडाकेबाज खेळी केली.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक दोन बळी घेतले. शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
अशा पडल्या न्यूझीलंडच्या विकेट्स
पहिला: सुंदरने 5व्या षटकात फिन अॅलनला सूर्याकरवी झेलबाद केले.
दुसरा: मार्क चॅपमनला 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुंदरने झेलबाद केले.
तिसरा: 13व्या षटकातील 5व्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने सूर्याला झेलबाद केले. त्याला कुलदीपने बाद केले.
चौथा: ड्वेन कॉनवे 18 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगकरवी हुडाच्या हाती झेलबाद झाला.
पाचवा: मायकेल ब्रेसवेल धावबाद. ईशान किशनने त्याला चालायला लावले.
सहावा : 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिवम मावीने मिचेल सँटनरला राहुल यादवकरवी झेलबाद केले.
पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग-11
भारत : शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: फिन ऍलन, ड्वेन कॉनवे, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जेकब डफी, ब्लेअर टिकनर, ईशा सोधी, लॉकी फर्ग्युसन.
प्रथम भारत-न्यूझीलंड हेड टू हेड पाहा…
रांचीमध्ये टीम इंडिया अजिंक्य
दोन्ही संघ हेड-टू-हेड आकडेवारीत बरोबरीवर आहेत. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 22 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 10 आणि न्यूझीलंड संघाने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामने टाय झाले आहेत. दुसरीकडे, रांचीच्या मैदानाबद्दल बोलायचे तर, भारताने या मैदानावर आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत.
सलग 5वा सामना जिंकण्याची संधी
आज भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सलग 5 सामने जिंकण्याची संधी आहे. याआधी भारताने भारतीय भूमीवर 4 सामने जिंकले आहेत. शेवटचा पराभव 2017 मध्ये राजकोटच्या मैदानावर झाला होता.
सलग चौथ्या मालिकेत भारत क्लीन स्वीप करू शकतो
भारताला सलग चौथ्या मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याची संधी असेल. याआधी भारताने मागील 3 मालिकेत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे.
हवामान अहवाल आणि खेळपट्टीची स्थिती
रांचीमध्ये शुक्रवारी पावसाची शक्यता फारच कमी आहे. पावसाची 10 टक्के शक्यता तर 90 टक्के हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी निवडू शकतो. येथे पाठलाग करणाऱ्या संघाने 25 पैकी 16 सामने जिंकले आहेत.
ऋतुराज गायकवाड जखमी, मालिकेतून बाहेर
ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला असून मनगटाच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याच्या बदलीची घोषणा केलेली नाही.