मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आजपासून १ फेब्रुवारीपर्यंत राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनात सुमारे ४० नोंदणीकृत खादी संस्था तसंच १५ राज्यांमधल्या प्रधानमंत्री रोजगार हमी योजना एककांनी भाग घेत पारंपरिक कारागिरांनी निर्मिती केलेल्या निर्यातयोग्य ग्रामोद्योग उत्पादन सादर केली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून कर्ज मर्यादेत २५ लाख रुपयांपर्यंत वाढ केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.