Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांचे सगळेच चाहते आहेत. त्याच्या आगामी चित्रपटाची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. त्याचे चित्रपट कधी एकदा चित्रपटगृहात जाऊन पाहतोय इतपत त्याच्या चाहत्यांना सलमानच्या चित्रपटांची आतुरता असते. आज सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि गेल्या काही तासांतच या चित्रपटानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. त्यामुळे युट्यूबवर सलमानच्या या चित्रपटाची सगळेच क्रेझ आहे. इंटरनेटवर या चित्रपटाचा टिझर तुफान व्हायरलही होऊ लागला आहे. सध्या या टीझरनं सलमानच्या चाहत्यांना नव्या वर्षातचं खुश करून टाकले आहे. सलमाननं आपल्या चाहत्यांसाठी हे पहिलं गिफ्ट आणलं आहे. (Salman Khan movie kisi ka bhai kisi ki jaan teaser releases on social media fan reacts)
या चित्रपटाचा दमदार टीझर सध्या प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खाननं केली आहे त्याचसोबतच या चित्रपटाला ‘झी स्टुडिओज’ही (Zee Studios) सहकार्य मिळाले आहे. टीझर पाहून इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यामुळे या टीझर सध्या जोरदार चर्चा आहे. ड्रामा, रोमान्स, फाईटींग, अॅक्शन या सगळ्यांचा मसाला या चित्रपटांतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सोबतच या चित्रपटात सलमानचा नवा लुकही चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये सलमान खान अभिनेत्री पूजा हेगडे सोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
आज 25 जानेवारीला शाहरूख खान, दीपिका पादूकोण आणि जॉन अब्राहमचा पठाण हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचपाठोपाठ आता सलमानच्या या नव्या ट्रेलरनं बॉलिवूड चाहत्यांना एक नवी ट्रीट मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे फरहाद सामजी यांनी केले आहे. हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री पूजा हेगडे, व्यंकटेश, शहनाज गिल, राघव जुयाल आणि पलक तिवारी अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटातून सलमानचे एक नाही तर अनेक लुक्स पाहायाला मिळणार आहेत. चित्रपटातून हटके गाण्यांची ट्रीटही प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाच्या ऑफिशियल टीझरची अनाऊंसमेंट सलमान खानंही आपल्या इन्टाग्रामपेजवरून केली आहे. त्याचसोबत #salmankhan #kisikabhaaikisikijaan हे दोन हॅशटॅग्सही सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
या चित्रपटाचा टिझर पाहून आता सगळ्यांनाचा हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा ट्रेलर 1 मिनिटे आणि 43 सेकंदाचा आहे.