राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिना निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. अमृत फडणवीस यांना थेट चित्रपटात गाण्याचा ब्रेक मिळाला आहे. आगामी चित्रपटासाठी अमृता यांनी ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा’ हे देश भक्तीपर गाण गायलं आहे. याच गाण्याचा व्हिडिओ ट्रेलर अमृत फडणवीस यांनी शेअर केला आहे.
‘भारतीयन्स’ हा बहुभाषिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी एक देश भक्तीपर गाण गायलं आहे. या गाण्याची झलक अमृता यांनी आपल्या प्रेक्षकांना दाखवली आहे.
‘तुम्हाला #republicday2023 च्या खूप खूप शुभेच्छा!आगामी बहुभाषिक चित्रपट ‘भारतीयन्स’ साठी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गाणे गाणं हा मोठा सन्मान होता. श्री सत्य कश्यप यांचं अंगावर शहारा आणणारं हे संगीत सर्वांनी ऐकायलाच हवं’ अशी पोस्ट अमृता फडणवीस यांनी केली आहे. त्याच्या यो पोस्टवर कमेंट्स आणि शुभेच्छांच वर्षाव होत आहे.
अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आणि आवड दोन्ही आहे. सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर केली आहेत. अमृता फडणवीसांनी संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांनी आपली गाण्याची आवड जपली आहे. फॅशनच्या बाबतीतही त्या आपल्या विशेष व्यक्तिमत्व टिकवून आहेत. अमृता फडणवीस या सोशल मिडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. त्या आपल्या अनेक इव्हेंट्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.