‘भोला’चा ट्रेलर लाँच आणि तब्बूची मस्ती:अजय देवगणला जवळ खेचत भर कार्यक्रमात केले किस, व्हिडिओ व्हायरल

भोला या चित्रपटात अजयसह तब्बू मुख्य भूमिकेत आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजयनेच सांभाळली आहे. ट्रेलर लाँचदरम्यान दोघांनी एकत्र एन्ट्री केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तब्बू आणि अजय यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी दोघांची जुनी मैत्री बघायला मिळाली. यावेळी तब्बूने अजयच्या दिग्दर्शकीय आणि तांत्रिक कौशल्यांचे कौतुक केले. दरम्यान यावेळी तब्बूला विचारले की तिचे चित्रपटाच्या सेटवर तिला पॅम्पर करण्यात आले का? यावेळी तब्बू गंमतीत असे म्हणते की लाड तर सोडाच अजय माझ्याकडे पाहून हसलाही नाही. असे म्हणत ती त्याच्या गालावर किस करते.
अजय आणि तब्बू यांच्यामध्ये घट्ट मैत्री आहे. दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी भोला या चित्रपटातून एकत्र मोठ्या पडद्यावर येतेय. अजय देवगणचा भोला हा चित्रपट साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात सुपरस्टार कार्ती शिवकुमारने मुख्य भूमिका साकारली होती. भोलाची कथा ड्रग माफियांभोवती फिरते. तर तब्बूने यामध्ये डॅशिंग पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे.