मुंबई : डॉ.आंबेडकर कॉलेज-वडाळा क्रिकेट संघाने बलाढ्य पोद्दार कॉलेजचा ६ विकेटनी पराभव करून मुंबई विद्यापीठाची मुंबई शहर विभाग १ आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा जिंकली. डॉ. आंबेडकर कॉलेजला विजेतेपद पटकाविण्यासाठी हर्शल जाधवची शानदार नाबाद शतकी फलंदाजी उपयुक्त ठरली. सुमेईर झव्हेरीने अर्धशतक फटकावूनही पोद्दार कॉलेजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
माटुंगा जिमखाना खेळपट्टीवर डॉ. आंबेडकर कॉलेजच्या संकेत यशवंते (४८ धावांत ३ बळी), अभिषेक यादव (३३ धावांत २ बळी) व मानस राजकर (३० धावांत २ बळी) यांच्या अचूक माऱ्यामुळे पोद्दार कॉलेजचा प्रारंभ निराशाजनक झाला. पोद्दार कॉलेजला धावांचे खाते उघडण्यासाठी सलामीचे दोन्ही फलंदाजांचा बळी देत १८ व्या चेंडूची वाट बघावी लागली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या सुमेईर झवेरीने (१०१ चेंडूत ६३ धावा, ६ परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या हर्शल जाधवने (९६ चेंडूत नाबाद १०२ धावा, १७ चौकार व १ षटकार) धडाकेबाज फलंदाजी करून डॉ. आंबेडकर कॉलेजच्या बाजूने अंतिम विजय झुकविला. हर्शलला श्रेयस वैद्य (४० चेंडूत ३२ धावा, २ चौकार व ३ षटकार) व संकेत यशवंते (३० चेंडूत नाबाद ३० धावा, २ चौकार व २ षटकार) यांनी उत्तम साथ लाभल्यामुळे डॉ. आंबेडकर कॉलेजने ३४ व्या षटकाला संकेतच्या षटकाराने ४ बाद १८६ अशी विजयी धावसंख्या रचली. विजेत्यांचे डॉ. आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जयश्री अय्यर, स्पोर्ट्स डायरेक्टर पी.पी.पाटील, उपप्राचार्य प्रा. गवई, आशिष गाडे, मनोज पाटील, अशोक कुवर आदी मंडळीनी अभिनंदन केले.