‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं. तर आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. यानिमित्त प्रार्थना आणि श्रेयस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या मालिकेचा त्यांचा प्रवास चाहत्यांची शेअर केला. तसंच एक खास कॅप्शन लिहित चाहत्यांना गुड न्यूजही दिली.
प्रार्थना आणि श्रेयस यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात मालिकेचा शेवटचा सीन शूट झाल्यानंतर सर्वांनी केलेला जल्लोष, या मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या काही व्हिडीओ क्लिप्स, काही बिहाईंड द सीन्स फोटो, मालिकेतील कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “शो संपतोय…..आपलं नात नाही…आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ…फक्त तुमच्यासाठी…आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय… *Picture* अभी बाकी है मेरे दोस्त…कुछ समझे?”
त्यामुळे आता मालिकेनंतर हीच लोकप्रिय जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे हे निश्चित झालं आहे. हा चित्रपट कोणता असेल, तो कधी प्रदर्शित होईल हे अद्याप गुलदस्तात ठेवण्यात आलं आहे. पण श्रेयस आणि प्रार्थनाला पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहायला मिळणार हे कळल्यावर चाहते खुश झाले आहेत. या व्हिडीओंवर कमेंट्स करत ते त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत आहेत.