बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी फक्त फिटनेससाठी नाही तर फॅशनसाठीही ओळखली जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच उर्वशीने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
उर्वशीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या आगामी द लिजेंड या चित्रपटातील आहे. या व्हिडीओत ती एक अक्शन सीन शूट करताना दिसत आहे. यात तिच्या हातात बंदूक दिसत आहे. तर पाठीमागून काही गुंड हातात हत्यार घेऊन तिचा पाठलाग करताना दिसत आहे. यासोबत तिने त्याला अनोखे कॅप्शनही दिले आहे.
“कृपया मला वाचवा. एक अभिनेत्री म्हणून माझा संपूर्ण भारतातील हा पहिला चित्रपट द लिजेंड येत्या २८ जुलैला जगभरात प्रदर्शित होत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांची मला गरज आहे”, असे कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे. तिचे हे कॅप्शन पाहून अनेक चाहते बुचकळ्यात पडले आहे. मात्र काही तासांनी तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.
उर्वशी रौतेलाच्या0 ‘द लीजेंड’ या बहुभाषिक चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. हा चित्रपट येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट हिंदीसह तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन बार्बरा बियालोवास करणार आहेत. ती रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसवर आधारित ‘ब्लॅक रोझ’ या द्विभाषिक थ्रिलरमध्ये तसेच सुपरहिट ‘थिरुत्तू पायले 2’ चा हिंदी रिमेकमध्येही उर्वशी दिसणार आहे