अनंत अंबानीच्या साखरपुड्यात दिपीकाचा जलवा, साडीची किंमत लाखाच्या घरात
अनंत अंबानीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गायिका श्रेया घोषालचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सर्वांनी मजामस्ती केली. तसेच बॉलिवूडमधील कलाकार, क्रिकेटर्स आणि इतर काही दिग्गज लोकांनी अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याला हजेरी लावली. यामध्ये सचिन तेंडूलकर त्याची पत्नी,अभिनेता आमिर खान, किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, करण जोहर, कतरिना कैफ आणि इतर काही कलाकारांचा समावेश आहे.
साखरपुड्याआधी अंबानी कुटुंबीयांनी एक फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये संपूर्ण अंबानी कुटुंब दिसत होते. त्यावेळी राधिकाने गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला. या लूकमध्ये राधिका अतिशय सुंदर दिसत होती. तर अनंतने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. अंबानी कुटुंबीयांचा हा एकत्र फोटो सोशल मीडियावर तुफान झाला आहे. या शाही सोहळ्यातील अनेक फोटो सध्या चर्चेत आहेत.