मुंबई, २५ जुलै २०२२: आपल्या क्षेत्राची व्याख्या नव्याने रचू पाहणा-या घडामोडीमध्ये ClanConnect.ai या भारताच्या अग्रगण्य इन्फ्लुएन्सर मार्केटिंग स्टार्ट-अप कंपनीने आपल्या कार्यपद्धतीचे एक नवीन मॉडेल अंमलात आणले आहे, जिथे ब्रॅण्ड्स आणि एजन्सींजना कोणतेही शुल्क न भरता इन्फ्लुएन्स अॅक्टिव्हेशनचा लाभ घेता येणार आहे. क्लॅनकनेक्ट.एआयच्या नव्या हस्तक्षेपांमुळे प्रवेशातील अडथळे काढून टाकले जाणार आहेत आणि सर्व उद्योगक्षेत्रांतील ब्रॅण्ड्स व एजन्सीजसाठी इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या क्षेत्राचे लोकशाहीकरण केले जाणार आहे. यामुळे एमएसएमईंना तसेच स्टार्टअप्सना इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या नव्या प्रवाहामध्ये सामील होता येणार आहे.
बहुतांश भारतीय ब्रॅण्डसना इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा अधिकाधिक फायदा करून घेता यावा यासाठी त्यांची मदत करण्यासाठी क्लॅनकनेक्ट.एआयने ‘कॉस्ट-पर-व्ह्यू’ हे नवीन मॉडेल अंमलात आणले आहे. हे मॉडेल ब्रॅण्डच्या आरओआय (व्यवसायातून मिळणारा परतावा)चे संरक्षण करते. याखेरीज ब्रॅण्ड्सना आपल्या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आपला आवाका, आपल्या ब्रॅण्डबद्दलची लोकांमधील जागरुकता आणि महसूल वाढविता यावा यासाठी कंपनीने कन्व्हर्जनच्या तत्त्वावर चालणारे अॅफिलिएट मॉडेलही आणले आहे.
शिवाय व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यास मदत करणारी आणि परिवर्तनीय उपायतंत्रे अंमलात आणत इन्फ्लुएसर्ससाठी एक समान संधी देणारे क्षेत्रही क्लॅनकनेक्ट.एआयकडून उपलब्ध करून दिले जात आहे. कंपनीची कॉस्ट-पर-व्ह्यू आणि अॅफिलिएट मॉडेल्स मायक्रो व नॅनो इन्फ्लुसर्सना हजारो ब्रॅण्ड्स आणि एजन्सी ब्रीफ्स उपलब्ध होऊ शकतील. या सोयीमुळे स्मॉल-स्केल इन्फ्लुएन्सर्सना लक्षणीय ब्रॅण्ड पार्टनरशिप्सच्या माध्यमातून महसूल मिळविणे शक्य होईल.
क्लॅनकनेक्ट.एआयचे सीईओ आणि सह-संस्थापक सागर पुष्प म्हणाले, “आतापर्यंत भारतातील इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचे जग हे नेहमीच मोठमोठ्या जाहिरात मोहिमांसाठी प्रमुख ब्रॅण्ड्सबरोबर टाय-अप करणा-या मोठ्या आणि सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर्सच्या बाजूनेच झुकलेले दिसते. खरेतर हे ब्रॅण्ड्स आपले इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी राखून ठेवलेले बजेट केवळ सर्वोत्तम ५ टक्के इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधण्यासाठीच राखून ठेवत आले आहेत. मात्र आमच्या हस्तक्षेपामुळे हे चित्र बदलेल आणि छोट्या स्तरावर काम करणा-या इतर इन्फ्लुएन्सर्सनाही ब्रॅण्ड्सशी वेगाने जोडून घेता येईल. दुस-या बाजूला यामुळे लहान-मोठे सर्व आकारांचे ब्रॅण्डस् विनामूल्य क्लॅनकनेक्ट.एआय मंचाशी जोडले जाण्यास उद्युक्त होतील आणि आपली इन्फ्लुएन्सर कॅम्पेन्स प्रसारित करू लागतील. क्लॅनकनेक्ट.एआय सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि प्रत्येक ब्रॅण्ड व इन्फ्लुएन्सर यात सहभागी होऊन भरभराटीस आलेल्या क्रिएटर अर्थव्यवस्थेमधून फायदा मिळवू शकतील ही गोष्ट आम्ही या नव्या कार्यपद्धतीद्वारे नव्याने अधोरेखित करत आहोत.”