खेळण्याच्या जबाबदार पद्धतींचा पुरस्कार करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेसाठी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि रॅपर व हिपहॉप आर्टिस्ट नियाझी करारबद्द
जानेवारी २०२३: भारतातील सर्वोत्तम ऑनलाइन स्किल गेमिंग ऑपरेटर्सचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना ई-गेमिंग फेडरेशन (EGF)ने प्लेअर्समध्ये खेळातील जबाबदार पद्धतींचा पुरस्कार करण्यासाठी ‘Asli Gamer’ ही मोहीम सुरू केली आहे. प्लेअर्सचे संरक्षण आणि जबाबदार खेळ यांच्याप्रती EGF च्या बांधिलकीचा पुनरुच्चार करणाऱ्या या विचारप्रवर्तक जाहिरात मोहिमेमध्ये जबाबदार गेमिंगच्या आश्वासक मापदंडांची रूपरेखा देण्यात आली आहे. प्लेअर्सना शिक्षित करण्याच्या आणि ऑनलाइन गेमिंगच्या कोणत्याही विपरित परिणामांपासून त्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूने ही जाहिरात बनविण्यात आली आहे.
ई-गेमिंग फेडरेशनचे सीईओ समीर बार्डे म्हणाले, “गेली चार वर्षे प्लेअर्सचे संरक्षण आणि जबाबदार गेमिंग ही EGF च्या स्व-नियामक मापदंडांची मूलतत्वे राहिली आहेत. या उद्योगक्षेत्रासाठी आम्ही प्लेअर्स आणि गेमिंग मंचांसाठी प्रामाणिक आणि पारदर्शी खेळाचा पुरस्कार करणारे जबाबदार गेमिंग साध्य करण्याचे व त्यांसाठीच्या सोयीसुविधा निर्माण करण्याचे महत्त्व यांवर नेहमीच भर दिला आहे. आमचे प्रमाणीकृत ऑपरेटर्स आधीपासूनच आमच्या आचारसंहितेचे पालन करत आहेत व दैनंदिन मासिक मर्यादा, सेल्फ-एक्स्लुजन, असुरक्षित प्लेअर्सना सहाय्य पुरविणे, प्लेअर्सच्या डेटाचे संरक्षण करणे, सुरक्षित पेमेंट्सची हमी देणे आणि मार्केटिंगच्या नियमांचा अवलंब करणे या व अशा इतर अनेक आवश्यकतांची पूर्तता करत आहेत. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत, मात्र तरीही जबाबदार गेमिंग हे अखेर व्यक्तीवरही अवलंबून असते. ‘Asli Gamer’ मोहीम हा आम्ही आमच्याजवळील माहिती आणि संसाधनांच्या साथीने प्लेअर्सच्या सक्षमीकरणासाठी आपणहून सुरू केलेला प्रयत्न आहे, जेणेकरून जबाबदारीने खेळणे ही गोष्ट त्यांच्या प्राधान्यक्रमांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर असेल. या दिशेने आणखी पुढचे पाऊल म्हणून आम्ही EGF च्या ‘रिस्पॉन्सिबल प्ले’ मॉडेलमधील पाच तत्वांवर भर देणाऱ्या जागरुकता मोहिमेचेही आयोजन करणार आहोत.”
या मोहिमेसाठी रॅपर आणि हिप-हॉप आर्टिस्ट नियाझी व आघाडीचा भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्यावर चित्रित झालेले या एक नव्या युगाचे रॅप गाणे प्लेअर्सना गेमचा आदर करण्याची, आनंदासाठी खेळण्याची, संतुलन जपण्याची, मर्यादा निश्चित करण्याची आणि खेळ नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसल्यास स्वत:ला त्यातून बाहेर काढण्याची अर्थात सेल्फ-एक्स्लुजनचा मार्ग निवडण्याची कळकळीची विनंती करते. प्लेअर्सना ‘Become Asli Gamer’ – सांगणारी अर्थात अस्सल स्पर्धक बनण्यासाठी प्रोत्साहन देणारी ही मोहीम भारतीय गेमिंग समुदायापर्यंत पोहोचेल आणि त्यांना स्व-मूल्यांकन कऱण्याची तसेच निरोगी गेमिंग पद्धती स्वीकारण्याची प्रेरणा देईल. स्व-मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्लेअर्सना एक ‘Asli Gamer’ बॅजसुद्धा मिळेल. ‘Asli Gamer’ रॅप साँग ऐकण्यासाठी लिंकवर जा.
भारतीय क्रिकेटर, शुभमन गिल पुढे सांगतो, “क्रिकेटच्या धावपट्टीवर जसे खेळाच्या न्याय्य पद्धतींचे पालन करणे महत्त्वाचे असते, तितकेच ऑनलाइन गेमिंग करताना जबाबदार गेमिंग वर्तणूक जपणे महत्त्वाचे आहे. प्लेअर्सना एकत्र आणणाऱ्या आणि सुरक्षित गेमिंग वातावरणासाठी मोकळ्या चर्चेचा पुरस्कार करणाऱ्या EGF च्या ‘Asli Gamer’ मोहिमेचा भाग झाल्याचा मला आनंद आहे.”
रॅप गाण्याचा रचनाकार नावेद शेख अर्थात नियाझी आपले मत मांडतो, “भारतात ऑनलाइन गेमिंग उद्योगामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि सुरक्षित खेळाचा पुरस्कार केल्यास सर्वोत्तम गेमिंग अनुभव मिळण्यामध्ये योगदान मिळू शकेल, असे मला ठामपणे वाटते. देशभरात जबाबदार गेमिंग तत्वांची आचारसंहिता परिमाणकारकरित्या प्रस्थापित करू पाहणाऱ्या EGF च्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रयत्नाचा भाग बनल्याचा मला अभिमान आहे. ही मोहीम भारतीय प्लेअर्समध्ये जबाबदार गेमिंगप्रती बांधिलकी अधिक भक्कमपणे रुजवेल आणि त्यांना बदल घडवून आणण्यास सक्षम बनवेल, अशी मला आशा आहे.”
MeiTY ने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग क्षेत्राच्या नियमनासाठी IT इंटरमीडिअरी नियम २०२१ मध्ये काही सुधारणांचा प्रस्ताव मांडला आहे. ग्राहक सुरक्षा आणि जबाबदार गेमिंग हे विषय केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला या प्रस्तावित मार्गदर्शक सूचना ग्राहकांच्या दृष्टीकोनातून अत्यंत चांगल्या आहेत आणि प्लेअर्सना संभाव्य धोक्यापासून सुरक्षित ठेवणे हा त्यांचा हेतू आहे.
मोहिमेसाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=TiIns9mwIoo