पुणे : पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावचे साहित्यिक श्री. गोपाळ बाळू गुंड यांच्या *सुमी व इतर कथा* ह्या कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रतिमा प्रकाशनच्या वतीने ८ जानेवारी २०२३ रोजी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या शुभहस्ते मांजरवाडी येथील सौभाग्य मंगल कार्यालयात संपन्न झाला.
याप्रसंगी थोरांदळे गावचे सरपंच जे. डी. टेमगिरे, प्रतिमा प्रकाशनच्या अस्मिता चांदणे, के. के. निकम सर, पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, नगरसेवक सुनील ढोबळे, निवृत्त उपप्राचार्य मधुकर वाघ सर, भिवसेन लोखंडे सर, लक्ष्मण गुंड इत्यादी मान्यवरांनी लेखक गोपाळ गुंड यांच्या आडतास, तुळस, सुमी कथासंग्रह व त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत शुभेच्छा दिल्या. चिरंजीव आदित्य गुंड यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी प्रतिमा प्रकाशनचे डॉ.दीपक चांदणे, उपसरपंच ॲड. संदीप टेमगिरे, जय हनुमान दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय विश्वासराव, थोरांदळे विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन थोरांदळे गावचे समाजसेवक बाळासाहेब भिकाजी टेमगिरे यांनी केले, तर आभार सौ. दीप्ती वाघोले यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यास गोपाळ गुंड यांचे कुटुंबिय, नातेवाईक, थोरांदळे गावचे ग्रामस्थ व जुन्नर आणि आंबेगाव परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी रुचकर भोजनाचा आनंद घेतला.