वाळवी… लाकूड पोखरणारी ही किड जर एखाद्या नात्याला लागली तर? ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना? अशीच नात्याला लागलेली ‘वाळवी’ लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून याचा नक्की काय भानगड आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपट येत्या १३ जानेवारी रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि आनंदाची बाब म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच १३ जानेवारीला जो प्रेक्षक संध्याकाळी सहा ते दहा वाजताच्या शोचे तिकीट काढेल, त्याला एका तिकीटावर एक तिकीट मोफत देण्याची घोषणा झी स्टुडिओज टीमतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची संक्रांत प्रेक्षक ‘वाळवी’ पाहून साजरी करतील.
‘वाळवी’ची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे असून सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.