मुंबई: मनीष हरिप्रसाद द्वारे निर्मित आणि विजय मौर्य दिग्दर्शित क्रॅश कोर्स ची निर्मिती ऑलेट फिल्म्स ने केली आहे.यामध्ये अमेज़ॅन ओरिजिनल चे 8 नवीन चेहरे जसे मोहित सोलंकी, ऋधू हारून, अनुष्का कौशिक, रिद्धी कुमार, भावेश बालचंदानी, आर्यन सिंग, हेतल गडा, अन्वेषा विज प्रेक्षकांसमोर समोर येणार आहेत.
क्रॅश कोर्समध्ये ज्येष्ठ कलाकार अन्नू कपूर, भानू उदय, उदित अरोरा, प्रणय पचौरी आणि बिदिता बॅग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
भारतातील आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमधील प्राइम मेंबर्स 5 ऑगस्ट पासून क्रॅश कोर्स स्ट्रीम करू शकतात
अमेज़ॅन प्राइम वर, नवीनतम आणि विशेष चित्रपट, टीव्ही शो, स्टँड-अप कॉमेडी, अॅमेझॉन ओरिजिनल्स, अमेज़ॅन प्राइम म्युझिक द्वारे जाहिरातमुक्त संगीत ऐकण्याच्या अमर्यादित स्ट्रीमिंगसह अविश्वसनीय मूल्य ऑफर करते. भारतातील सर्वात मोठ्या उत्पादनांवर फ्री फास्ट डिलिवरी, टॉप डील्सवर लवकर प्रवेश, प्राइम रीडिंगसह अमर्यादित वाचन, आणि प्राइम गेमिंगसह मोबाइल गेमिंग सामग्री, हे सर्व रु. 1499 च्या वार्षिक सदस्यत्वासाठी उपलब्ध आहे. प्राईम व्हिडिओ मोबाईल एडिशनची मेंबरशिप घेऊन ग्राहक क्रॅश कोर्स देखील पाहू शकतात. प्राइम व्हिडीओ मोबाईल एडिशन हा सिंगल युजर, मोबाइल-ओन्ली प्लान आहे जो सध्या केवळ एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
मुंबई, भारत – 25 जुलै 2022- अमेज़ॅन प्राइम व्हिडिओने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित ओरीजनल ड्रामा सिरीज क्रॅश कोर्स चा ट्रेलर रिलीज केला. या ट्रेलरमध्ये विद्यार्थ्यांच्या अत्यंत स्पर्धात्मक जीवनाची रोमांचक कथा दाखवण्यात आली आहे कारण ते विद्यार्थी जीवनातील दडपणांना तोंड देत जीवनात मार्गक्रमण करतात, तसेच काळाच्या कसोटीवर टिकून राहतील अशी मैत्री निर्माण करतात. प्रवेश परीक्षेत उच्च गुण मिळवण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या करिअरला आकार देणारी मैत्री, प्रेम, समवयस्कांचा दबाव आणि स्पर्धा या विविध पैलूंची झलक दाखवणारा हा उत्कंठावर्धक ट्रेलर आहे. कोचिंग इन्स्टिट्यूटमधील शत्रुत्वाने विद्यार्थ्यांच्या जीवनात कशी नासधूस होते व कसा विध्वंस निर्माण करतो हे देखील यात दाखवण्यात आले आहे.
क्रॅश कोर्स मनीष हरिप्रसाद यांनी तयार केला आहे आणि विजय मौर्य दिग्दर्शित आहे आणि ओलेट फिल्म्स द्वारे निर्मित आहे. ही सिरीज 10 भागांचा ओरिजिनल ड्रामा आहे जो पात्रांच्या चित्रणातून विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध आव्हानांचे चित्रण करणाऱ्या अनुभवी आणि नवीन प्रतिभांचे मिश्रण एकत्र आणते. अभिनेते मोहित सोलंकी, हृदय हारून, अनुष्का कौशिक, भावेश बालचंदानी, आर्यन सिंग, हेतल गडा, आणि अन्वेषा विज हे आयआयटी इच्छुकांच्या भूमिकेत आहेत, तर रिद्धी कुमार हे मेडिकल कोचिंगचा विद्यार्थी आहे. या शोमध्ये भानू उदय, उदित अरोरा, प्रणय पचौरी आणि बिदिता बाग यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.
निर्माते मनीष हरिप्रसाद म्हणाले – “क्रॅश कोर्स ही एक विशेष सिरीज आहे. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत असतात तेव्हा ह्या रॅट रेस मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात फिल्टर न केलेले वास्तविक लेन्स लागू करते. विजय मौर्याने या जहाजाच्या कॅप्टनची भूमिका बजावून उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि या मालिकेद्वारे आमच्या प्रतिभावान कलाकारांना आणि त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट कलागुणांना सर्वांसमोर आणले आहे. प्रणय, उदित, बिदिता आणि भानू सारखे अनुभवी कलाकार तसेच अन्नू जी सारख्या अभिनयाच्या पावरहाउस ने मालिकेत स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे, आमच्या प्रत्येक अभिनेत्याने त्यांचे सर्वोत्कृष्ट गुण पुढे आणले आहेत. क्रॅश कोर्स हा बघणाऱ्यांसाठी एक आकर्षक आणि मनोरंजक अशी मेजवानी ठरणार आहे आणि ही अमेज़ॅन ओरीजनल सिरीज 240 देश आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी आम्ही अत्यंत उत्साहित आहोत.”
दिग्दर्शक विजय मौर्य म्हणाले – “क्रॅश कोर्स हे प्रेमाचे खरे श्रम आहेत. विचार करायला लावणारी, मनाला भिडणारी आणि मनोरंजन करणारी ही कथा आहे. ही मालिका विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात कौटुंबिक आणि समवयस्कांच्या दबावाशी झुंज देताना प्रौढावस्थेत मार्गक्रमण करत असताना त्यांना सामोरे जावे लागणारे आनंद आणि संघर्ष यांचा सर्वांगीण परिप्रेक्ष्य प्रदान करते. क्रॅश कोर्स मध्ये केवळ अन्नू जी, भानू, उदित, बिदिता आणि प्रणय यांसारख्या अभिनेत्यांना दिग्दर्शित करण्याचा सौभाग्य मला प्राप्त झाले नाही तर (ते प्रत्येकजण निःसंशयपणे ताकदीचे कलाकार आहेतच), नवीन प्रतिभावान अभिनेत्यांसोबत देखील काम करण्याचा बहुमान मला मिळाला आहे ज्यांनी जीव ओतुन पात्रांच्या आत प्रवेश करून त्यांच्यातील कसब पणाला लावून सर्व काही या सिरीज साठी दिले आहे. हा शो 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये सुरू होईल याबद्दल मला खरोखरच आनंद झाला आहे आणि मी सिरीजला साठी प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.”
क्रॅश कोर्स बद्दल बोलतांना अन्नू कपूर म्हणाले – “ क्रॅश कोर्स साठी माझ्याशी संपर्क साधल्याबरोबर, त्याच्या आकर्षक विषयामुळे मला त्याचा एक भाग होण्याची खात्री पटली होती. अमेज़ॅन प्राइम व्हिडिओ भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणारे कंटेंट तयार करत आहे आणि मला खात्री आहे की क्रॅश कोर्स त्याच्या साठी एक मानाचा तुरा असेल. ही सिरीज विद्यार्थी जीवनातील साध्या सोप्या गोष्टीतून आनंद मिळविण्याची आठवण करून देईल आणि त्याच वेळी अशा अत्यंत स्पर्धात्मक काळात विद्यार्थी होण्याच्या दबावाबद्दल विचार करण्यास प्रेरित सुद्धा करेल. क्रॅश कोर्स ने मला मनीष सारख्या प्रतिभावान निर्मात्यासोबत आणि विजय सारख्या अष्टपैलू दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी दिली, त्या दोघांचीही या शो बद्दलची दृष्टी खूप स्पष्ट होती आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा एकंदरीत अनुभव खूपच छान होता.”
क्रॅश कोर्स चा प्रीमियर खास अमेज़ॅन प्राइम व्हिडिओवर 5 ऑगस्ट 2022 पासून भारतातील आणि 240 देश आणि प्रदेशात दाखविण्यात येईल.