मुंबई ¡ एकीकडे उर्फी जावेद हिच्यावर बोलायला पक्षातील नेत्यांना वेळ आहे परंतु मी भाजपचीच पदाधिकारी असूनही माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, मदत करण्यासाठी पक्षातील लोकांना वेळ नाही. श्रीकांत देशमुख यांनी मला खोटे आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले व माझ्यावर अन्याय केला असा आरोप निर्मला यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील यांच्यासोबत भाजपच्या निर्मला यादव यांनी पुणे येथे आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अजूनही पक्षाने माझी हाक ऐकावी आणि मला न्याय द्यावा असेही आवाहन केले तसेच पक्षातीलच श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पक्ष माझे ऐकत नाहीये
निर्मला देशमूख म्हणाल्या, मी माझ्या स्वईच्छेने आलीय. माझ्या पक्षातच माझे ऐकले जात नाही. मी सतत चार ते पाच महिने पक्षाची इज्जत वाचवत होते. परंतु, आज कोर्टात माझे वकीलही त्रस्त झाले. संविधानाचा गैरवापर होत आहे. आज मी पुण्यात आले. सुषमा अंधारे यांच्याशी ओळख काढली. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत घेत आहे.
मला इमोशनल आमिष दाखवले
निर्मला यादव म्हणाल्या, मी पोलिस एफआयआर केला. मी लेखी तक्रारीचा पाठपुरावा करीत आहेत. श्रीकांत देशमुख यांनी मला खोटी आमिषे देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मलाही त्यांच्याबाबत काही प्रश्न होते परंतु ते माझा विश्वास संपादन करीत होते. त्यांनी मला इमोशनल केले, आमिष दाखवला. मी नातेवाईक असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवत गेली.
हृदयविकाराचे खोटे नाटक केले
निर्मला यादव म्हणाल्या, मला लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनी मला शाॅपींग करुया असेही म्हटले. शालू आणि साड्या घेऊ असे सांगितले. रुमवर आल्यानंतर त्यांनी हृदयविकाराचे नाटक केले व रडले. रडत बोलले की, मी टेन्शनमध्ये आहे. फोटो किंवा व्हिडिओ काढू देत असेल तरच लग्न करेल असे सांगितले.
मला धक्कादायक अनुभव
निर्मला यादव म्हणाल्या, माझी नार्को टेस्ट करावी मी सत्य बोलतेय हे मुख्यमंत्र्यांकडेही पत्राद्वारे केलीय. महिला म्हणून मी पक्षाकडे मदत मागायला गेले. सांगलीत एका नेत्याकडे गेली तेव्हा मला धक्कादायक अनुभव आला. माझ्यावरच आरोप करण्यात आले होते. याचाही मला मनस्ताप झाला.
म्हणून मी सुषमा अंधारेंकडे आले
निर्मला यादव म्हणाल्या, श्रीकांत देशमुख यांनी मला मी जशी आहे तशी पसंद आहे असे सांगितले. सर्व रेकाॅर्डींग्ज माझ्याकडे आहेत. सर्व घटनांचा मनावर परिणाम होत आहे. माझा पक्ष उर्फीवर बोलतो परंतु, स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्तीचे ऐकले जात नाही. चंद्रकात पाटील यांना एवढेच बोलायचे आहे की, माझा आवाज आज तरी ऐका, माझ्यावर झालेला अन्याय न्यायप्रविष्ठ आहे. माझ्यावर खरा अन्याय झाला पण श्रीकांत देशमुखांना उसंत मिळत आहे. माझा पक्ष ऐकत नाही म्हणून सुषमा अंधारे यांच्याकडे आले. त्यांनी माझी पोस्ट शेअर केली त्यामुळे मी त्यांना भेटले.
नाते नाकारले जात आहे – सुषमा अंधारे
सुषमा अंधारे म्हणाल्या, निर्मला देशमूख यांच्याशी श्रीकांत देशमुख यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले पण आता नाते नाकारले जात आहे. निर्मला देशमूख या भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षाच्या पत्नीच नाही तर मुंबई प्रदेश युवती जनरल सेक्रेटरी आहेत.
निर्मला यादव यांना मदत मिळाली नाही
सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपकडे निर्मला देशमूख यांनी मदत मागितली. पक्षांतर्गत गोष्ट म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याकडे मदत मागितली. केवळ पक्षीयच नव्हे तर कौटुंबिक पातळीवरही मदत मागितली पण मदत मिळाली नाही. कपड्यावरुन भाजपच्या महिला नेत्या टीका करीत आहेत. पण निर्मला देशमुख यांना त्रास दिला जात आहे. काल परवा प्रकाश महाजन यांचे मानसिक संतूलन ढासळले, त्यांच्यावर मी बोलणार नाही परंतु एकूण सर्वच महिलांकडे बघण्याचा चष्मा या लोकांचा काय आहे तो लक्षात यायला हव्या. निर्मला यादव यांची कैफीयत गृहमंत्र्यांनी ऐकायला हवी. निर्मला देशमूख यांनी 376 ची केस दाखल केली परंतु, त्यांना न्याय मिळत नाही.
काय आहे प्रकरण
सोलापूर येथील भाजप पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांची काॅल रेकाॅर्डींग व्हायरल झाली होते. श्रीकांत देशमुखांशी आपणच बोललो, हे निर्मला यादव यांनी सांगितले होते. या रेकाॅर्डिंगमध्ये निर्मला यादव यांची समोरील व्यक्ती समजूत काढताना समजून येते.