-15 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या 18व्या आवृत्तीसाठी 55,000 हून अधिक रनर्सची नोंदणी
– माजी आशियाई चॅम्पियन गोपी आणि चार वेळची विजेती सुधा सिंग यांच्यावर भारताची भिस्त
– टाटा मुंबई मॅरेथॉन 2020 मधील एकूण ईकॉनॉमिक इम्पॅक्ट 202.78 कोटी
मुंबई, जानेवारी 2023: आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची जगभरात एक वेगळी ओळख आहे. येथे राहणार्या आणि येणाऱ्या प्रत्येकाला या शहराकडून जगण्याचे एक वेगळे स्पिरीट मिळते. एक वेगळी ऊर्जा मिळते. प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे मुंबईच्या या स्पिरीटमध्ये आणखी भर पडते. यंदाची,18वी आवृत्ती रविवार, 15 जानेवारी रोजी होत असून त्यात 55,000 हून अधिक व्यावसायिक आणि हौशी धावपटू मुंबईच्या रस्त्यावर उतरतील. त्याच वेळी संपूर्ण शहर #HarDilMumbai च्या उत्सवात चैतन्यमय होईल.
महाराष्ट्र सरकार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, गृह मंत्रालय, एमसीजीएम, मुंबई पोलीस, भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन, जागतिक ऍथलेटिक्स (डब्ल्यूए) यांच्या पाठिंब्यामुळे आणि असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेस (AIMS), ग्लोबल स्पोर्ट्स कम्युनिकेशन तसेच आमचे प्रायोजक आणि भागीदार यांच्यामुळे टाटा मुंबई मॅरेथॉनचे दणक्यात पुनरागमन होत आहे.
गेल्या सतरा वर्षांपासून टाटा मुंबई मॅरेथॉनचा प्रवास कायापालट करणारा आहे. या कार्यक्रमाने खेळाच्या पलीकडे जाऊन शहर आणि देशावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे. प्रथमच, प्रोकॅम इंटरनॅशनलने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटसह एक विशेष अहवाल तयार केला आहे जो या प्रतिष्ठित शर्यतीचा आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावरील परिणाम स्पष्ट करतो.
405,000 अमेरिकन डॉलर ईतके बक्षीस असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन ही वर्ल्ड अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेसमधील अव्वल 10 मॅरेथॉनपैकी एक आहे. स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय एलिट खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करता यावर्षी, सहभागी डझनभर पुरुष आणि सहा महिलांनी स्पर्धा विक्रमापेक्षा कमी वेळेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. 100 मीटर धावणे प्रकारातील सर्वात तरुण विश्वविजेता, जमैकाचा योहान ब्लेक हा टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 चा आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर आहे आणि त्याची मुंबईतील उपस्थिती मॅरेथॉनचा वाढता प्रभाव अधोरेखित करते.