अलीकडच्या कालात खुप मराठी म्युजिक एल्बम आपनासा दिसत आहेत त्यातील ठराविक प्रेक्षकांच्या पसंतीत येतात,आज नुकतच एक गान यूट्यूब चैनल वर प्रसिद्ध झाले असुन त्या गाण्याचे शीर्षक आहे “असा ये ना”. हया गाण्याला डैशिंग रोहित राउत आणि सुमधुर गायिका नेहा राजपाल ने आपल्या आवाजने खुपच श्रवणीय केले आहे तसेच प्रवीण कुंवर ने संगीत दिले असुन गाण्याचे बोल कौतुक शिरोडकर ह्यांचे आहेत.
गाण्याबद्दल संगायचे तर हे खास करून देशाचे सैनिक आणि त्यांच्या धाड़सी पत्नीना समर्पित आहे. हया गाण्यात सैनिक पति देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आहे, तर दूसरी कड़े पत्नी आपल्या पतिच्या आठवनित व्याकुळ झाली आहे, त्यांची हीच तळमळ गान्या द्वारे दिसेल आणि हे गाने प्रेक्षकाना नक्की आवाडेल अशी आशा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आहे.
धरणी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अहमदाबादची असून त्यांनी प्रथम प्रोजेक्ट मराठी गाणं करण्याचे ठरवले धरणी प्रोडक्शन बॅनरच पहिल गाणं म्हणजे “असा ये ना” झाले, निर्माती सुनीता नायक अहमदाबाद मधील आहेत, चित्रपट क्षेत्राशी खास करुन मराठी साठी खूप लगाव असल्यामुळे त्यांनी मराठीमध्येच काम करायचं ठरवले तसेच त्यांनी उत्सव आणि सनांनवर गाने प्रदर्शित करायचं आणि नवीन टॅलेंटला प्रोत्साहन द्यायचं अस त्यांनी ठरवले आहे.
असा ये ना चे मोहन नामदेव राठौड़ यांनी दिग्दर्शन केले असुन ह्यापूर्वी ही त्यांनी मन काहुर, दनका, मनधुंध पायवाट या मराठी आणि मेरा जहां या हिंदी गाण्याचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. या यशश्वी गाण्यानंतर अमित डोलावत आणि अंजली नान्नजकर हया जोड़ी सोबत हे नवीनतम गाने घेउन आले आहेत. दोघांन बद्दल सांग्याचे तर अभिनेता अमित डोलावत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात ओळखीचे नाव आहे, ह्यापूर्वी त्यांनी हिंदी तसेच मराठी मलिका आणि चित्रपट केले आहेत , तर अंजली नान्नजकर यांनी हिंदी मराठी चित्रपट आणि मालिकेमधून काम केलेले आहे आणि पहिल्यांदाच म्यूजिक एल्बम मध्ये झळकनार आहे.