- प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याबद्दल भारतभरातील १००+ शहरांमधील ३५ लाख मुलांना माहिती देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
- गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे रिसायकलिंग करून बेंच-डेस्क सेटची आवश्यकता असलेल्या शाळांसाठी ते तयार करण्यात येणार आहेत
- १८००० किलो प्लास्टिक कचऱ्यापासून १००० रिसायकल करण्याजोगे बेंच आणि डेस्क तयार करण्यात येत आहेत; या कार्यक्रमांतर्गत ८०+ शाळांना देण्यात आले आहेत.
जानेवारी २०२३ : स्वच्छ, हरित आणि सुदृढ भविष्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील निर्धारांना सहाय्य करण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांची एसडीजी ध्येये (शाश्वत विकास ध्येये), विशेषतः एसडीजी १२ ध्येये (जबाबदारीने उपभोग व निर्मिती) साध्य करण्यासाठी, ITC Ltd.च्या Sunfeast YiPPee! या लोकप्रिय इन्स्टंट नूडल्स व पास्ता ब्रँडतर्फे लाँच करण्यात आलेल्या त्यांच्या YiPPee! बेटर वर्ल्ड ट्रॅश-टू-ट्रेझर कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल जागरुकता निर्माण करत आहे. अधिक चांगले जग घडविण्याची वृत्ती बिंबविण्याच्या ब्रँडच्या मिशनशी हा कार्यक्रम सुसंगत आहे. Sunfeast YiPPee! तर्फे वे फॉर लाइफ या एनजीओ भागीदाराच्या भागीदारीने हे अभियान राबविण्यात येत आहे.
प्लास्टिकचा कचरा, पर्यावरणावरील त्याचा परिणाम, तो कमी करणे, पुनर्वापर व रिसायकल करण्याची धोरणे याबद्दल शाळांमध्ये प्रत्यक्ष जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून १०० शहरांमधील ३५ लाख विद्यार्थ्यांमध्ये वर्तणूक बदल घडविण्यासाठी हा उपक्रम YiPPee!ने तयार केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यातून विद्यार्थ्यांना घरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करणे व शाळेत निश्चित केलेल्या संकलन बिंदूंमध्ये जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बेंच व डेस्कचे १००० संच तयार करण्यासाठी या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्यात येणार आहे.
आतापर्यंत बंगळुरूमध्ये रिसायकल केलेले ८० बेंच देण्यात आले आहेत आणि मार्च २०२३ पर्यंत हे ध्येय साध्य करण्याची योजना आहे.
या उपक्रमाबद्दल ITC फुड्स डिव्हिजनच्या स्नॅक्स, नूडल्स आणि पास्ता विभागाच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कविता चतुर्वेदी म्हणाल्या, “ITC हे जागतिक पातळीवर शाश्वततेचे आदर्श आहेत. त्यांच्यातर्फे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेक बहुमितीय उपक्रम राबविण्यात येतात आणि मोठ्या स्तरावरील उपजीविका कार्यक्रमांना सहाय्य करण्यात येते. ग्राहक-वापरानंतरच्या पॅकेजिंगच्या कचऱ्यासाठी सर्क्युलर इकोनॉमी तयार करण्यास सहाय्य करण्याच्या संस्थात्मक प्रयत्नांपासून प्रेरणा घेत Sunfeast YiPPee!ने प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी, पुनर्वापर करण्यासी आणि रिसायकल करण्यासाठी शाळांमध्ये कम्युनिटी चॅम्पिअन्स तयार करण्यास मदक करण्याचा प्रवास सुरू केला आहे. YiPPee!चा ट्रॅश-टू-ट्रेझर उपक्रम अधिक चांगले जग निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची शालेय विद्यार्थ्यांना माहिती आणि प्रोत्साहन देईल, अशी आम्हाला खात्री आहे.