मुंबई : मुंबईतील गरवारे क्लब येथे तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक व आमदार श्रीकांत भारतीय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनाथ मुलांना मोबाईल आणि टॅबचे वाटप करण्यात आले. या वितरण समारंभाला महाराष्ट्र विधानसभेचे नूतन अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि स्वामी ब्रिजमोहन दास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
तर्पण फाऊंडेशनचे एमडी आणि संस्थापक श्रीकांत भारतीय यांनी या कार्यक्रमात सांगितले की, 18 वर्षे पूर्ण झालेल्या अनाथाश्रमतील अनाथ मुला-मुलींच्या पुनर्वसनाची, शिक्षणची, स्वता: चा ओळखपत्र, आदि हे गंभीर समस्या असताना या समस्येचे निराकरण करण्यासाठी तर्पण फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत १५२ अनाथ मुलांना तर्पणने दत्तक घेऊन त्यांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन तर्पणचे संचालक संतोष मानूरकर यांनी केले. तर आभार श्रीमती उमा चव्हाण यांनी मानले